शनिवार, ६ एप्रिल, २०१३

जिल्ह्यात लवकरच "ई-चावडी'


- विशाल पाटील - सकाळ वृत्तसेवा शनिवार, 6 एप्रिल 2013 - 03:45 AM IST Tags: e-chavadi, satara, western maharashtra सातारा - ग्रामीण चावडीत सातबारा किंवा इतर उतारे, दाखले काढावयास गेल्यानंतर वर्षानुवर्षांच्या फाईलींच्या ढिगाऱ्यातून पाने चाळणारे तलाठी, कोतवाल व त्यांचे सहायक दिसतात. चार वेळा खाडाखोड करत लिहिणारा कोतवाल आणि सहीसाठी हलेपाटे मारायला लावणारा तलाठी, यामुळे तलाठी कार्यालयाची पायरीच चढायला नको वाटते. आता मात्र, हे चित्र पूर्णच पालटणार आहे. जुन्या उतारा डायरीची जागा आता लॅपटॉप व हस्तलिखित उताऱ्यांची जागा प्रिंटरवरील उतारा घेणार असून जिल्ह्यात लवकरच ई-चावडी उपक्रम सुरू होणार आहे. जिल्ह्यात महसूल प्रशासन गतिमान होण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी "ई-चावडी योजना' जिल्हाभर राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महसूल प्रशासन ई-चावडीच्या माध्यमातून लवकरच सुरू होईल. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी वेळप्रसंगी सुमारे 30 हजार रुपयांचे कर्ज काढून स्वखर्चाने लॅपटॉप व प्रिंटर खरेदी केले आहेत. महिनाभरात ही योजना सुरू झाल्यानंतर "हायटेक तलाठी- हायटेक महसूल प्रशासन' अशी प्रतिमा रूढ होणार आहे. दाखले मिळणार लॅपटॉपवर एक महिन्यात सर्व तलाठ्यांच्या हाती सॉफ्टवेअरने सुसज्ज लॅपटॉप मिळणार आहेत. त्यानंतर जातीचा, हयातीचा, रहिवासी, उत्पन्नाचा व तलाठ्याचा दाखला तसेच 7/12, 8 अ, शेतसारा भरलेले ई जमाबंदीचे दाखले देणे सुरू होईल. यासाठी लवकरच तलाठ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. आठवड्यातून एकदा याविषयी सर्व तलाठ्यांची चर्चा व महिन्यातून एकदा सर्व रेकॉर्डचे अपडेट व नोंदीत फेरफार असल्यास ते केले जाणार आहेत. दाखले, फेरफार अपडेट लॅपटॉप व प्रिंटर्सच्या साह्याने संगणकीकृत सात-बारा उतारा देणे, सात-बाराचे अद्ययावतीकरण करणे, ऑनलाइन फेरफार घेणे, तलाठ्यांनी लॅपटॉपवर झालेला फेरफार व बदल जिल्हा सर्व्हरवर पाठविणे, फेरफार नोंदीचा आणि दिलेल्या दाखल्यांचा गोषवारा काढणे, ऑनलाइन जमाबंदी करणे, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम खंड 4 प्रमाणे सर्व नमुने लॅपटॉपवर टाकणे आणि त्यांच्या नोंदी अद्ययावत करणे अशी कामे करण्यात येणार आहेत. योजना एका क्‍लिकवर कालांतराने संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, श्रावणबाळ योजनांच्या लाभार्थींची गावनिहाय यादी, "आम आदमी' आणि स्कॉलरशिप लाभार्थ्यांची यादी, स्वस्त धान्य दुकाननिहाय कार्डधारकांची नावे, युनिट्‌सची संख्या व मिळणाऱ्या धान्याचे परिमाण आणि मासिक आवक-जावक, दरमहा जन्मणाऱ्या मुला-मुलींची संख्या व टक्केवारी, त्यांना लाभ दिल्याच्या नोंदी, रोहयो अंतर्गत मजूर नोंदणीची संख्या, वर्षभरातील कामाचे नियोजन व झालेली कामे आदी नोंदी लॅपटॉपवर घेतल्या जातील. तलाठ्यांना आर्थिक "शॉक' ही योजना राबवण्यासाठी तलाठी, मंडलाधिकाऱ्यांनी स्वत:च लॅपटॉप घ्यायचे आहेत. त्यासाठी कऱ्हाड तालुक्‍यातील बहुतांशी तलाठ्यांनी नामांकित बॅंकेतून 30 हजार रुपयांचे लॅपटॉपसाठी कर्ज उचलले आहे. तसेच प्रिंटर खरेदीसाठीही तलाठ्यांना खर्च करावा लागणार आहे. संगणकीकृत दाखले 15 रुपयांना देणात येणार असून त्यातील पाच रुपये महसूल जमा केला जाणार आहे. त्यामुळे दहा रुपयांत तलाठ्यांना सर्व खर्च भागवावा लागेल. ई-चावडी, ई-फेरफारचे फायदे महसूल विभागात पारदर्शकता येणार 'पुन्हा या'ची दिरंगाई टळणार सर्व डाटा अपडेट राहणार दाखले त्वरित व अचूक मिळणार सर्व रिपोर्ट क्षणात उपलब्ध होणा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा