रविवार, २४ फेब्रुवारी, २०१३

मिरचीचे एकात्मिक व्यवस्थापन


जगभरात चविष्ट पदार्थात - चव निर्माण करण्यासाठी मिरचीचा सहभाग प्रकर्षाने जातो. मिरचीमुळे भारतातील अनेक छोटे-छोटे गावं सातासमुद्रापलिकडे जोडले गेले आहेत-हे सत्य मिरचीची महती कळायला पुरेसे आहे. फक्त विदेशीच नाही तर देशी बाजारपेठेतही मिरचीची मागणी मोठी आहे. प्रक्रिया उद्योगातही श्रेष्ठतम् मिरचीची भरपुर मागणी आहे. महाराष्ट्रात २ लाख हेक्टर क्षेत्र मिरची लागवडी खाली असून, एकूण क्षेत्रापैकी ७५ टक्के क्षेत्र जळगाव, धुळे, नंदुरबार, नगर, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, नागपूर, अमरावती, चंन्द्रपूर व उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात हिरव्या मिरचीचे उत्पादन २०० ते ५०० क्विंटल प्रती हेक्‍टरी उत्पादकता शेजारील राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या २५ % मात्र आहे. सदर तंत्राचा अंतर्भाव केल्यास उत्पादकतेत कमालीची सुधारणा शक्य आहे. पुर्व तयारीसाठी कंपोस्टर, मिश्र-जैविक खत, व मिश्र-सुक्ष्मअन्नद्रव्याचा उपयोग: मिरचीसाठी काळी आणि पाण्याचा लगेच निचरा होणारी जमीन हवी. थोडा वेळ साठणारे पाणी उत्पादकडतेत मोठी घट निर्माण करू शकते कारण मिरची बुरशीजन्य रोगाला लवकर बळी पडते. हे टाळण्यासाठी उच्च दर्जाचे, संपुर्ण कुजलेले व बुरशी प्रतिरोधक कंपोस्ट वापरणे आवश्यक आहे. कंपोस्टर हे उत्पादन ह्या कामी अत्यंत उपयुक्त असून त्याचा वापर शेणखत तथा कृषिकचऱ्याच्या विघटनासाठी तर होतोच शिवाय तयार होणारे कंपोस्ट खत शेतात पसरवल्यावर ते बुरशीजन्य रोगांना प्रतिरोध करते. अशा कंपोष्ट मधे ह्यूमिक आम्लाचे प्रमाण जास्त असल्याने ह्यूमिक एसिडची वरमात्रा देण्याचि गरज उरत नाही. १ किलो कंपोस्टर सुचवलेल्या पद्धतीने वापरल्याने ४-५ टन घनपदार्थाचे जलद विघटन शक्य आहे. कोरडवाहू जमिनीत हेक्‍टरी ३०-४० टन तर बागायतीत २०-२५ कंपोस्ट वापरायचे आहे. कंपोस्ट पसरवण्यापूर्वी त्यात प्रती टन २५० ग्रॅम मिश्र-जैविक खत हे जीवाणू संवर्धक वापरल्याने जमिनीचा कस वाढवण्यास व रासायनिक खताची मात्रा ४० टक्के कमी करण्यास मदत होईल. मिश्र-जैविक खत हे उत्पादन निवडक सूक्ष्मजीवांचे मिश्रण असून ते नत्र स्थिरीकरण करते तसेच स्पुरद व पालाशच्या सुप्त साठ्यांचे विघटन करते. मिश्र-सुक्ष्मअन्नद्रव्य हे उत्पादन महाराष्ट्र सरकारच्या निर्देशानुसार बनवले गेले असून मातीतून सूक्ष्मद्रव्याचा समान पुरवठा व्हावा या दृष्टीने कंपोस्ट मधे प्रती टन ०.५ किलो या प्रमाणात मिसळावे. जोमदार रोपासाठी बुरशीनाशक व कीटक-नियंत्रकाचा वापर: मिरचीचे उत्पादन बियाणे व माती पेक्षा रोपाच्या जोमावर अवलंबुन असते. त्यासाठी ३ X १ मीटर आकाराचे २० से. मी. उंचीचे गादी वाफे तयार करावेत. प्रत्येक वाफ्यात कंपोस्टरचा उपयोग करून बनवलेले उच्च दर्जाचे कंपोस्ट भरपूर प्रमाणात व ५० मी. ली. ट्रायकोडर्मा व ५० मि.ली. शुडोमोनास मिसळावे. वाफ्याच्या रूंदीत १० से. मी. अंतरावर २-३ से. मी. खोल चर पाडून बियाण्याची पातळ पेरणि करावी व ते मातीने झाकून टाकावे. बी उगवून येई पर्यंत झारी ने पाणी टाकावे व त्यानंतर ५-६ दिवासाने पाटाने पाणी द्यावे. पेरणी पासून १५ दिवसांनी प्रत्येक वाफ्यात ५० ग्रॅम दाणेदार युरीया द्यावा. गरजेप्रमाणे फोरेटचा उपयोग करावा. रोपे उगवून आल्यावर १०-१५ दिवासांनी कीटक नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड ची (५ मी. ली./१० ली) व गंधक युक्त कोळिनाशकाची (३० ग्रॅम/१० ली.) पाण्यात टाकून फवारणि करावी. या प्रक्रीयेमुळे फुलकिडे (थ्रिप्स), कोळी (माईटस) व मावा (अफिड) इत्यादी कीडींचे नियंत्रण होऊन, बोकडया (चुरडामुरडा) या विषाणूजन्य रोगाचा प्रसारही रोखला जाईल. गरज वाटल्यास आठवड्याचा विश्रांती नंतर ५ मी. ली डायमेथोएट किंवा मोनोक्रोटोफॉस १५ मि.ली./ १० लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे. पूनर्लागवड व एकात्मिक व्यवस्थापन: मिरचीचे पीक दीर्घ मुदतीचे व अधिक तोडनीचे असल्याने त्याचे कीडनियंत्रण व खत नियोजन जातीने करावे लागते. १ टन कोरड्या मिरचीच्या उत्पादनासाठी ४५ किलो नत्र, ३० किलो स्पुरद व ३५.८ किलो पालाशची गरज भासते. त्याव्यतिरिक्त किडीचा व बुरशीचा ताण कमी करणे तसेच सूक्ष्मअन्नद्रव्याची उपलब्धता /शोषण वाढवणे अतिशय महत्वाचे आहे. शाखीय वाढ नियंत्रित करून पुलांची व फळांची संख्या वाढवता येते. पूनर्लागवडीची प्रक्रिया: १० लिटर पाण्यात १०० मी. ली. फायलोफ्लोरा, २५ ग्रॅम युरीया व १०० मि.लि. शुडोमोनास चे द्रावण बनवून सर्व रोपे बुडवून लगेच काढावे. या प्रक्रियेमुळे रोप ताजे रहाते व सुरवातीची वाढ जोमदार होते. मरतुक कमी होते. लागवड करतांना रोपाच्या उंचीच्या एक चतर्थाउंश भाग मुळाकडुन मातीत बुजवावा. मिरचीच्या बागायती पिकाला जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे. प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी पाणी देऊ नये. झाडे फुलावर आणि फळावर असताना पाण्याचा ताण पडू देऊ नये. रोप लावणीनंतर १० दिवसात शेतात रोपांचा जम बसतो. या काळात एक दिवसाआड शेताला हलके पाणी द्यावे. त्यानंतर ५ दिवसांच्या किंवा एक आठवड्याच्या अंतराने पाणी द्यावे. साधारणतः हिवाळ्यात १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाण्याची पाळी द्यावी. तर उन्हाळ्यात ६ ते ९ दिवसांनी पाणी द्यावे. ठिबक सिंचन पध्दतीनेही पाणी देता येते. त्यामुळे पाण्याची बचत होऊन उत्पादन वाढते. हेक्टरी खताचा एकात्मीक डोसः * ठिबक मधून देता येईल महत्वाचे रोग आणि त्यांचे लक्षण - १) रोपांची मर - (डँम्पींग ऑफ) हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. गादीवाफ्यात किंवा लागवडीनंतर रोपांना बुरशीची लागण होते. लागण झालेली रोपे निस्तेज आणि मलूल होतात. रोपाचा जमिनीलगतचा खोडाचा भाग आणि त्यामुळे रोप कोलमडते.रोप उपटल्यावर सहज वर येते. २) फळे कुजणे आणि फांद्या वाळणे - (फ्रुट रॉट अँड डायबँक) हा रोग कोलीटोट्रीकम कँपसीसी या बुरशीमुळे होतो. या रोगाच्या प्रादुर्भाव झालेल्या हिरव्या किंवा लाल मिरचीवर वर्तुळाकार खोलगट डाग दिसतात. दमट हवेत रोगाचे जंतू वेगाने वाढतात आणि फळावर काळपट चट्टे दिसतात. अशी फळे कुजतात आणि गळून पडतात. बुरशीमुळे झाडाच्या फांद्या शेंड्याकडून खाली वाळत जातात. प्रथम कोवळे शेंडे मरतात. रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास झाडे सुकून वाळतात तसेच पानांवर आणि फांद्यावर काळे ठिपके दिसतात. ३)भुरी - (पावडरी मिल्ड्यू) भुरी रोगामुळे मिरचीच्या पानाच्या वरच्या आणि खालच्या बाजूवर पांढरी भुकटी दिसते. या रोगाच्या प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास झाडाची पाने गळतात. महत्वाच्यी किडी आणि त्यांची ओळख - फुलकिडे (थ्रिप्स) - हे किटक आकाराने अतिशय लहान असून त्यांची लांबी एक मिलीमिटरपेक्षाही कमी असते. त्यांचा रंग फिकट पिवळा असतो. हे किटक पाने खरवडून त्यातून बाहेर येणा-या रसाचे शोषण करतात. त्यामुळे पानांच्या कडा वरच्या बाजूला चुरडलेल्या दिसतात. हे किटक खोडातील रसही शोषतात, त्यामुळे खोड कमजोर बनते,पाने गळतात आणि झाड सुकते. याशिवाय फुलकिड्यामुळे बोकडया (चुरडामुरडा) या विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो.या किडीच्या उपद्रवामुळे मिरचीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. कोळी (माईटस) - या कीडीला पायाच्या चार जोड्या असल्यामुळे या किडीच्या समावेश किटकवर्गात होत नाही. ही किड अतिशय लहान असून किडीचा रंग पिवळसर करडा असतो. कोळी पानातील रसाचे शोषण करतात. त्यामुळे पानांवर चुरडा दिसू लागतो. चुरडलेल्या पानाच्या कडा खालच्या बाजूस मुडपल्या जातात. फुलांच्या अवस्थेत या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास फुले गळतात. फळे वेडीवाकडी होतात आणि फळांच्या आकार लहान राहतो. मावा - मावा हे किटक मिरचीच्या कोवळ्या पानांतील आणि शेंड्यातील रस शोषण करतात. त्यामुळे नविन पाने येणे बंद होते. लेडी बर्ड बीटलचे संवर्धन करा...लेडी बर्ड बीटलच्या विविध प्रकारच्या प्रजाती आहेत. त्यांच्या पाठीवरील पंखांवर विविध रंगांचे आणि आकारांचे ठिपके आढळतात. या मित्रकीटकाची अळी व प्रौढावस्था मावा, मिली बग, फुलकिडे, कोळी, खवले कीड आदी किडींना खातात. तरच करा कीटकनाशची फवारणी: प्रत्येक पानावर ६ फुलकिडे आढळल्यास अथवा १०% पेक्षा जास्त झाडांवर प्रादुर्भाव असल्यास तसेच प्रत्येक पानावर ५-१० कोळी आढळल्यास अ.क्र. १, ३,९ या फवारण्या पोषक आहेत , अ.क्र. २, ४ व ५ या फवारण्या संजीवक आहेत , अ.क्र. ६ वी फवारणी बचावात्मक आहेअ.क्र. ७,८ व १० या फवारण्या सुधारणात्मक आहे. पोषक व बचावात्मक फवारण्या अवश्य कराव्यात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा