सोमवार, १७ डिसेंबर, २०१२

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान

                                 राष्ट्रीय फलोत्पादन अभियान

केंद्रीय कृषि मंत्री मा. शरद पवार साहेब यांनी १९९० पासून महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेतून १०० टक्के अनुदानावर फळबाग लागवडीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला. महाराष्ट्र राज्य आज फलोत्पादनातील अग्रेसर राज्य म्हणून विकासाची फळे चाखत आहे. फळबागांच्या क्षेत्र विस्तारा बरोबर राज्यात फलोद्यान पिकांच्या दर्जेदार उत्पादन विक्री व प्रक्रीया व्यवस्था उभी करणे महत्वाचे होते आणि याच उद्देशाने राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचा जन्म झाला. शेतक-यांच्या आर्थिक उत्कर्षासाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान ही महत्वाकांक्षी योजना सूरू करून ख-या अर्थाने पुन्हा एकदा हरीतक्रांतीची चळवळ सुरू केलेली आहे. उत्पादकांपासून उपभोक्त्यांपर्यंत फलोत्पादन पिकाच्या मालाची योग्य साखळी निर्माण करणे आणि यामध्ये उत्पादक शेतकरी, काढणी नंतरचे व्यवस्थापन करणारी यंत्रणा, प्रक्रीया उद्योजक, विक्री व्यवस्था यांच्या विकासासाठी या अभियानात विविध योजनांचा आंतर्भाव करण्यात आलेला आहे.

      राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून वैयक्तीक शेतक-यांच्या विकास संकल्पनेपेक्षा सामुदायीक शेतक-यांच्या गटाची स्थापना करून त्याच्यात विकास घडवून आणण्यावर भर दिला आहे. त्यामुळे शेतक-यांना या अभियानातून आपल्या शेतीच्या विकास करून आर्थिक उन्नती साधावयाची असेल तर एका विचाराचे एक समान गरजेसाठी शेतक-यांचे गट स्थापन करण्याची नितांत गरज आहे. या अभियानात जमिनीचा पोत सुधारण्यापासून बियाणे, कलमे, रोपे, खते, औषधे या प्रारंभीच्या गरजांबरोबरच काढणी, वाहतूक, साठवणूक, प्रक्रीया व विक्री व्यवस्था या सर्व समावेशक विकास कार्यक्रमाचा अंतर्भाव आहे.

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान उद्दिष्टे

अ)               फलोत्पादन क्षेत्राचा संशोधन, तंत्रज्ञान प्रसार, काढणीत्तोर तंत्रज्ञान, प्रक्रीया, पणन सुविधा यांच्या मध्यमातून सर्वांगीण विकास.

ब) शेतक-यांचे आर्थिक राहणीमान उंचावणे, व आहार विषयक पोषणमुल्य वाढविणे.

क) अस्तित्वात असलेल्या फलोत्पादन विषयक विविध योजनांमध्ये समन्वय साधून एकरूपता विकास व त्याचा प्रसार आणि प्रचार करणे.

ड) पारंपारीक उत्पादनत पध्दतीची आधुनिक शास्त्रीय ज्ञानाशी सांगड घालून तंत्रज्ञानाच्या विकास व त्याचा प्रसार आणि प्रचार करणे.

इ) कुशल आणि अकुशल विशेषतः बेरोजगार तरुणांकरीता रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.

प) सन २०११-१२ या अभियानाच्या कालावधीअखेर पर्यंत फलोत्पादन क्षेत्राचे दुप्पट करणे.
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान २००५-०६ विविध योजना

१) आदर्श रोपवाटीका स्थापना -

   फलोत्पादन निश्चीत व शाश्वत उत्पन्न देणारे क्षेत्र म्हणून ओळखले जाते राष्ट्रीय फलोत्पादन अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यात सन २००५-०६ मध्ये लागवडीसाठी नवीन क्षेत्र आणणे, जून्या, बागांचे पुनरूज्जीवन करणे, नवीन वाणांची लागवड करणे इ. कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक व खाजगी क्षेत्रात आदर्श रोपवाटीका तयार करणे प्रस्तावीत आहे.

उद्देश

१)                  राज्यात सार्वजनिक व खाजगी क्षेत्रात ४ हेक्टरच्या मोठ्या व १ हे. च्या छोट्या रोपवाटीका तयार करणे.

२)                 राज्यातील शेतक-यांसाठी फलोत्पादन पिकांची उत्कृष्ट वाणांची दर्जेदार व रोगमुक्त कलमे किंवा रोपे शेतक-यांना उपलब्ध करून देणे.

३)                 नवीन निर्यातीस वाव असलेल्या फलोत्पादन पिकांच्या वाणाच्या मातृवृक्षांची लागवड करणे.

४)                 नवीन निर्यातीस वाव असलेल्या फलोत्पादन पिकांच्या वाणांची माहिती शेतक-यांना देणे तसेच उच्च तंत्रज्ञानाची प्रात्यक्षीके आयोजीत करणे.

५)                रोपवाटीका धारकांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजीत करून त्यांचे तांत्रिक व व्यवसायीक क्षमतेत वाढ करणे.

आदर्श रोप वाटीका तयार करणेसाठी

१)                  पॉलीहाऊस २) शेडनेट ३) मिस्ट चेंबर ४) मातृवृक्ष लागवड (फळे किंवा फुले) ५) मातृवृक्षासाठी ठीबक किंवा तुषार सिंचन ६) पाणी साठवण सुविधा ७) माती निर्जंतुकीकरण संयंत्र या बाबींचा समावेश असेल.

पात्र लाभार्थी वैयक्तिक लाभार्थी, सहकारी कायद्याखाली नोंदविलेली संस्था, कृषि विज्ञान केंद्र इ.
अनुदान


रोपवाटीका

सार्वजनिक क्षेत्र

खाजगी क्षेत्र

मोठी रोपवाटीका ४ हे

रू. १८.०० लाख

रु. ९.०० लाख

लहान रोपवाटीका १ हे

रु. ३.०० लाख

रू. १.५० लाख

 

२)                 रोहयो (रोजगार हमी योजना) निगडीत फळबाग क्षेत्रविस्तार

राज्यात कृषि हवामानातील विविधतेमुळे अनेक प्रकारची फळपिके घेणे शक्य आहे. तसेच क्षेत्र विस्तारासाठी वाव असल्या कारणास्तव या योजनेचा समावेश केला गेला आहे.
उद्देश

१)                  प्रत्येक विभागातील हवामानानुसार चांगल्या प्रकारे येणा-या फळपिकाखालील क्षेत्र विस्तार करणे.

२)                 फळपिकांचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी एकात्मिक किड व्यवस्थापनावर भर देणे.

३)                 जुन्या दुर्लक्षीत फळबागांचे उत्पादन वाढीसाठी अत्यावश्यक निविष्ठांच्या पुरवठा करणे.

४)                 फळांचे उत्पादन वाढीसाठी शेतक-यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे.

५)                वनस्पती आरोग्य चिकित्सालय, मुलद्रव्ये तपासणी प्रयोगशाळा व रोगाचे पुर्वानुमान केंद्रस्थापनेसाठी अर्थसहाय्य देणे.

६)                  अभियानातील लागवडी समुह पध्दतीने करतांना परीसर ही संकल्पना लक्षात घ्यावी.

या योजना चिकू, डाळींब, कागदी लिंबू या फळपिकांची लागवड करण्यात येणार आहे. तसेच या योजनेमध्ये बहुवर्षीय द्राक्ष पिक व वार्षिक द्विवार्षिक केळी पिकाचा समावेश करण्यात आलेला आहे.

अनुदान

अ)बहुवार्षीक द्राक्ष क्षेत्र विस्तार याकरीता खर्चाच्या ७५ टक्के किंवा कमाल रुपये २२५०० प्रती हेक्टर अर्थसहाय्य राहील.

ब) वार्षिक / द्विवार्षिक केळी क्षेत्रविस्तार याकरीता खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल रुपये १५०००/ अर्थसहाय्य देय राहील.

अर्थसहाय्य तिन वर्षामध्ये ५०.३०.२० याप्रमाणे विभागून देण्यात येईल. तसे द्राक्ष व केळी या दोनही पिकांकरीता क्षेत्रमर्यादा ४.०० हेक्टरपर्यत राहील.
३)जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन व उत्पादकता वाढविणे

ब-याचशा फळबागा या नांग्या न भरणे खते व औषधे यांचा अयोग्य वापर व अय़ोग्य मशागतीय पध्दतीचा अवलंब केल्याने जुन्या बागांची उत्पादकता कमी झालेली असून या घटकांपर्यत या बागेचे पुनरुज्जीवन करून उत्पादकता वाढविणे हा उद्देश आहे.

 

पुनरुज्जीवन करावयाच्या फळझाडांचे वय खालील प्रमाणे


अ.क्र

फळपिकांचे नाव

फळपिकांचे वय (वर्ष)

 

 

कमीत कमी वय

जास्तीत जास्त वय


आंबा

२०

५०


चिक्कू

२५

५०


डाळींब


२०


संत्रा

१०

२५


मोसंबी

१०

२५


लिंबू


२०
लाभार्थी वैयक्तिक शेतकरी, संस्था, स्वयंसेवी गट, अशासकीय गट.

अनुदान खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल रुपये १५०००/ प्रती हेक्टर याप्रमाणे राहील. कमाल २.०० हेक्टर क्षेत्रापर्यंत लाभ घेता येईल.
४)भाजीपाला विकास कार्यक्रम

वाढती मागणी पुर्ण करण्यासाठी भाजीपाला पिकाचे उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे सेंद्रीय पध्दतीने भाजीपाला करणे सुधारीत व संकरीत बियाणे वापरण्यावर भर देणे आवश्यक आहे.

उद्देश

१)                  आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हवामानातील विविधतेनुसार भाजीपाला पिके पुर्ण वर्षभर मिळतील हे पाहणे

२)                 अधिक उत्पादन देणा-या वाणांचा वापर करून व सुधारीत उत्पादन तंत्रज्ञानाद्वारे भाजीपाला पिकांचे उत्पादन व गुणवत्ता वाढविणे.

३)                 सार्वजनिक व खाजगी क्षेत्रामार्फत संकरीत व सुधारीत वाणांचे भाजीपाला बियाणे व रोपे यांचा वेळेवर पुरवठा करणे.

४)                 सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांकरीता बियाणे हताळणी व बिजप्रक्रीयासाठी सोयीसुबिधा उपलब्ध करून देणे.

लाभार्थी १) कृषि विद्यापिठे २) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ ३) सार्वजनिक व खाजगी बिज उत्पादक

   संस्था कृषि विभागामार्फत बियाणे उत्पादन / विक्री परवाना धारक खाजगी बिजोत्पादक कंपन्या / संस्था तसेच प्रगतीशील शेतकरी / परवाना धारक फलोत्पादन रोपवाटीका मात्र कृषि पदविका / कृषि पदवीधारकांना प्राधान्य.

 

अनुदान

अ.भाजीपाला बियाणे उत्पादन            सार्वजनिक क्षेत्र      खाजगी क्षेत्र

                              १०० टक्के रु.       ५०टक्के २५०००

                              ५००००/प्रती         प्रती हेक्टर

हेक्टर              (क्षेत्रमर्यादा ४ हेक्टर पर्यत)

ब. भाजीपाला रोपे उत्पादन हरीतगृहामध्ये रोपे तयार करून पुनर्लागवडीसाठी रोपे उपलब्ध करून देणे याकरीता खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल १२५००० /-प्रती ०.०५ हेक्टर चे हरीतगृह एवढे अनुदान उपलब्ध राहील.

क. बियाणांच्या हाताळणीकरीता सोयीसुविधा

                              सार्वजनिक क्षेत्र            खाजगी क्षेत्र

महाबिजकरीता            कृषि विद्यापिठाकरीता

१२५ लाख प्र.युनिट         ५ लाख प्रती युनिट              २५ टक्के किंवा

                                                      कमाल २ लाख

५)पुष्पोत्पादन विकास कार्यक्रम

फुलांची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील मागणी विचारात घेता फुलाखालील क्षेत्र वाढविण्यास वाव असल्याकारणाने ही योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये

१)         मोठ्या शहराच्या सभोवती हरीतगृहातील तसेच हरीतगृहाबाहेरील अपारंपारीक पिकांचे क्षेत्र वाढविणे.

२)        पारंपारीक फुलशेतीमध्ये बदल करून सुधारीत व चांगले उत्पादन देणा-या जातींच्या लागवडीसाठी उपयोग करणे.

३)        फुलांची निर्यात वाढविणेचे दृष्टीने हरितगृहातील फुलांचे क्षेत्र व उत्पादन देणा-या जातींच्या लागवडीसाठी उपयोग करणे.

४)       शेतक-यांना फुलांच्या अद्यावत उत्पादन व काढणी पश्चात तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण आयोजीत करणे.

१)         नवीन बागेची स्थापना करणे

लाभार्थी   अल्प / अत्यल्प व इतर भुधारक क्षेत्र मर्यादा अल्प / अत्याल्प करीता २     हेक्टर तर इतर करीता ४ हेक्टर अशी आहे.

अ)         कट फ्लॉवर्स हरीतगृहातील तसेच हरीतगृहातील तसेच हरीतगृहाबाहेरील अपारंपारीक पिकांचे क्षेत्र उत्पादन व गुणवत्ता वाढविणे. यामध्ये गुलाब, अँस्टर, बर्ड ऑफ पँराडाईज, गोल्डन रॉड इ. पिकांचा समावेश आहे.

अनुदान

      अल्प / अत्यल्प भुधारक          इतर भुधारक

      ५० टक्के कमाल ३५०००/          ३३ टक्के कमाल २३१००/

      प्रती हेक्टर                     प्रती हेक्टर

 

ब) कंदवर्गीय फुले यामध्ये निशिगंध, ग्लँडीओलस, लिलिज, डेलिया इ. पिकांचा समावेश आहे.

 

अनुदान

      अल्प / अत्यल्प भुधारक          इतर भुधारक

      ५० टक्के कमाल ४५०००/         ३३ टक्के कमाल २९७००/

      प्रती हेक्टर                           प्रती हेक्टर

 
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान

क)               सुट्टी फुले यामध्ये झेंडू, अँस्टर, गलार्डीया, शेवंती, मोगरा, झिनीया, बिजली, जाई, जुई इ. पिकांचा समावेश आहे.

अनुदान

                  अल्प / अत्यल्प भूधारक                 इतर भूधारक

                  ५० टक्के कमाल १२००० /               ३३ टक्के कमाल७९२०

                  प्रती हेक्टर                           / - प्रती हेक्टर

२)        काढणीपश्चात व्यवस्थापन व सुविधा

उत्पादकांना जास्त भाव मिळण्यासाठी उत्पादीत फुलांचे योग्य प्रकारे मुल्यवर्धन करणे, ग्राहकांच्या मागणीप्रमाणे पुरवठा करणे याकरीता शेतकरी किंवा शेतकरी समुहाने प्रतवारी गृह, पुर्वशितकरण केंद्र, शितगृह या बाबींची सुविधा निर्माण करणे या उद्देशाने खालील बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.

लाभार्थी शेतकरी / शेतकरी समुह

अ)               प्रतवारी गृह उभारणी

अनुदान २५ टक्के कमाल रु.६२५००/ प्रती युनीट

ब) पुर्वशीतकरण केंद्र उभारणे

अनुदान २५ टक्के कमाल ६ लाख प्रती युनीट

क)               शीतगृह उभारणी

 अनुदान डोंगराळ व अदिवासी              इतर

भाग ३३.३ टक्के कमाल           २५ टक्के कमाल

रु. ६७ लाख                    रु. ५० लाख

 
6)      मधुमक्षिका पालन

फलोत्पादनाचे पिकाचे उत्पादन वाढीसाठी मधूमक्षिका पालन हा पूरक जोड व्यवसाय होवू शकतो. मधमाशा फुलातील मध गोळा करता अप्रत्यक्षपणे परागीकरणाचे मोठे काम करीत असतात यामुळे जवळ जवळ ३० टक्के पर्यंत उत्पादनात वाढ होवून, मध, मेण यासारखी दुय्यम उत्पादने सुध्दा मिळतात.

अ)               मधुमक्षिका कॉलनी विकासात प्रोत्साहन देणे व त्याचे न्युक्लीअस स्टॉकचे उत्पादन-योग्य जातीची निवड करून मधमाश्यांच्या पालन केंद्र पुणे यांच्याकडे देण्यात य़ेईल.

ब) मधुमक्षिका कॉलनीचे वाटप लगतच्या ४ शेतक-यांचा १ गट तयार करून या गटास मधुमक्षीका संचाचे वाटप करण्यात येईल.

अनुदान ५० टक्के कमाल रुपये ८०० प्रती मधुमक्षिका संच.

क)               मधुमक्षिका पालन प्रशिक्षण खादी ग्रामोद्योग विकास महामंडळ अथवा राज्य मधुमक्षीका पालन केंद्र पुणे यांच्याकडे पाच दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येईल.

7)फलोत्पादन विषयक पिक प्रात्यक्षिके

अ)               सार्वजनिक क्षेत्रातील आदयरेषीय प्रात्यक्षिके नवनवीन तंत्रज्ञानाचा शेतक-यांमध्ये प्रचार करण्याच्या उद्देशाने हरितगृह तंत्रज्ञानावर आधारीत कृषि विभागाची प्रक्षेत्रे, कृषि चिकित्सालये, कृषि विद्यापीठ प्रक्षेत्रे, कृषि विज्ञान केंद्र प्रक्षेत्रे या ठिकाणी ही प्रात्यक्षीके घेतली जातात.

अनुदान १०० टक्के कमाल रु.५ लाख प्रति ०.०५ हे. चे हरितगृह.

   याच प्रकारची प्रात्यक्षिके प्रगतशील शेतक-यांच्या शेतावर हरितगृहाशिवाय घेतल्यास खर्चाच्या ७५ टक्के अनुदान देय राहील.

ब) शेतक-यांच्या शेतावरील प्रात्यक्षिके यामध्ये कमी उत्पादकतेची कारणे शोधून त्यानुसार सुयोग्य व्यवस्थापन पध्दती, एकात्मिक कीड व खत व्यवस्थापन, द्रवरुप खते, इ. बाबींचा समावेश करून प्रात्याक्षिके घेण्यात येतील.

अनुदान ७५ टक्के कमाल रु.१०००० प्रती एकर (क्षेत्र मर्यादा १ एकरापर्यंत)

क) चांगली शेती करण्याची प्रात्यक्षीके महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या सहाय्याने ही प्रात्यक्षीके राबविण्यात येतील.

ड) गँप प्रात्यक्षीकासाठी प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या सहाय्याने प्रशिक्षणाच्या कार्यक्रम राब
 
८) कृषि तंत्रज्ञान प्रसार केंद्राची स्थापना

      या केंद्राद्वारे माहितीची गरज ओळखुन त्यावर आधारीत संगणीकृत माहिती इंटरनेटच्या माध्यमातून गावातील माहिती केंद्रांना उपलब्ध करून देण्यात येईल. सदर केंद्र इंटरनेटद्वारे ऑनलाईन पध्दतीने कृषि सल्ला देण्यासाठी कार्यरत राहील. तसेच या केंद्रावर निर्माण होणारी माहिती गरजावर आधारीत, अचुक, योग्य वेळी स्वरुपात गावापर्यत पोहोचविणे सक्तीचे राहील.

लाभार्थी राज्यातील कृषि विद्यापिठे, कृषि महाविद्यालये, कृषि विज्ञान केंद्र, स्वयंसेवी संस्था.

अनुदान ५० टक्के किंवा कमाल रुपये १० लाख
 
       ९) कृषि बाजार सुविधा केंद्राची स्थापना

      शेतक-यांच्या तयार होणा-या मालाविषयी उपलब्ध बाजारपेठेविषयी आणि प्रामुख्याने विविध सुविधा पुरविणा-या संस्थाविषयी सतत माहिती मिळविणे पृथःकरण करणे, व ती माहिती व सेवा शेतक-यांना पुरविणे आवश्यक राहील.

लाभार्थी प्रमुख बाजारपेठा, कृषि उत्पन्न बाजार समिती, कृषि विज्ञान केंद्र, कृषि चिकीत्सालय, स्वयंसेवी संस्था.

अनुदान खर्चाच्या ५० टक्के कमाल रुपये १०.०० लाख.

१०) फलोत्पादन पिकासाठी पँक हाऊस उभारणी

      फलोत्पादन पिकाच्या मुल्यवृध्दीमध्ये वाढ करणे स्वच्छता करणे, प्रतवारी करणे, योग्य पँकींगचा वापर करणे इ. बाबींचा समावेश आहे.

लाभार्थी शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी संघ, कृषि विषयक कार्य करणा-या स्वयंसेवी संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, निमशासकीय संस्था, खाजगी उद्योजक.

अनुदान   डोंगराळ व आदिवासी भागासाठी          इतर भागासाठी

            ३३.३३ टक्के कमाल रु.८३५००/-          २५ टक्के कमाल रु.६२५००

११) वातानुकुलीत वाहन सुविधा

वाहतुकी दरम्यान फळे, फुले व भाजीपाला, यासारख्या नाशवंत मालाचा दर्जा टिकवून ठेवणे, याकरीता याबाबींचा समावेश करणेत आलेला आहे.

लाभार्थी शेतकरी गट, संघ, पिक उत्पादक संघ, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, निमशासकीय संस्था, खाजगी उद्योजक, स्वयंसेवी / सहकारी संस्था, महामंडळे, कृषि उत्पन्न बाजार समिती.

अनुदान     डोंगराळ व आदिवासी भागासाठी          इतर भागासाठी

            ३३.३३ टक्के कमाल रु.८.००             २५ टक्के कमाल

            लाख                                रु. ६.०० लाख

१२) करारपध्दतीच्या शेतीस चालना देणे

      फलोत्पादीत मालाला वाजवी दर मिळवून देणे प्रक्रीया उद्योजक व निर्यातदारास खात्रीचा माल उपलब्ध होणे व फळप्रक्रीयांच्या क्लस्टर्समध्ये पणन प्रक्रीया बळकट करून देणे हे उद्देश यामध्ये सामावलेले आहेत.

लाभार्थी शेतकरी, शेतकरी गट, उद्योजक, निर्यातदार

अनुदान २५ शेतक-यांच्या गटास प्रती शेतकरी रु. २५०० प्रमाणे एका गटास ६२५००/-

 
१३) पणन सुविधा उभारणे

      ग्रामीण बाजार, अपनी मंडी, थेट बाजार, या बाबींचा यामध्ये समावेश असून शेतक-यांना वाजवी दर मिळण्याकरता मध्यस्थांची संख्या कमी करणे व मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे हा उद्देश आहे.

लाभार्थी सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, पिक उत्पादक संघ,

अनुदान २५ टक्के कमाल रु.३.७५ लाख.

 
१४) कांदाचाळ उभारणी -

      साठवणुकीतील नुकसानीचे प्रमाण कमी करून कांदा दिर्घकाळ टिकविणे, व शेतक-यांना वाजवी दर मिळवून देण्याकरता या घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे.

लाभार्थी नोंदणीकृत कांदा उत्पादक सहकारी संस्था, शेतकरी, शेतकरी समुह,

अनुदान २५ टक्के किंवा कमाल रुपये ५०० प्रति मे.टन


१५) एकात्मिक अन्नद्रव्य व किड व्यवस्थापन प्रसिध्दी व प्रचाराबाबत योजना

अ) उर्वरीत अंश तपासणी सर्व फळे व भाजीपाला व इतर फळपिके, यातील उर्वरीत अंश तपासणी करण्याकरीता खालीलप्रमाणे अनुदान प्रस्तावीत आहे.


अ.क्र.

पिके

तपासणी करावयाची औषध संख्या

अनुदान


फळे भाजीपाला, इतर फळपिके

१०

५० टक्के कमाल रु.

२०००/  


फळे भाजीपाला, इतर

फळपिके

८०

५० टक्के कमाल रु

४०००/


फळे भाजीपाला, इतर फळपिके (सेंद्रीय पध्दतीने)

१०

७५ टक्के कमाल रु. २०००/


फळे भाजीपाला, इतर फळपिके (सेंद्रीय पध्दतीने)

८०

७५ टक्के कमाल रु. ४०००/

 

ब) एकात्मिक किड व्यवस्थापनाबाबत प्रात्यक्षीके यांत्रीक भौतीक जैविक व रासायनिक व पर्यावरणीय पध्तीचा एकात्मिक वापर करून किडीचे व्यवस्थापन करणे हा मुख्य हेतू आहे. एका लाभार्थ्यास जास्तीत जास्त ४.० हेक्टर पर्यंत अर्थसहाय्य देणे प्रस्तावीत आहे.

लाभार्थी शेतकरी

अनुदान - ५० टक्के, कमाल रुपये १०००/ प्रती हेक्टर

क) रोगअनुमान केंद्र भविष्यात येणा-या रोगांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी रोगाचे पूर्वानुमान मिळणेकरीता या केंद्राची स्थापना करण्यात यावी.

लाभार्थी कृषि विद्यापिठे, कृषि विज्ञान केंद्र, शासकीय प्रक्षेत्रे,

अनुदान- १०० टक्के, कमाल रुपये ४.०० लाख

ड) जैविक औषधे निर्मिती प्रयोगशाळा रासायनिक औषधांचा वापर मर्यादित ठेवणेकरीता जैविक औषधांचे उत्पादन करणे या दृष्टीकोनातून या घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे.

लाभार्थी खाजगी संस्था, सार्वजनिक उपक्रम.

अनुदान -   खाजगी संस्था,            सार्वजनिक उपक्रम

            ५० टक्के कमाल           १०० टक्के कमाल रुपये

            रु. ५.०० लाख             २० लाख

ई) उती पाने यामधील सुक्ष्म अन्नद्रव्ये तपासणी प्रयोगशाळा पानामध्ये असणा-या विविध अन्नद्रव्यांची उपलब्धता पाहण्यासाठी व त्यांची गरज समजणेकरीता सुक्ष्म अन्नद्रव्याची तपासणी करणे आवश्यक असल्याने या बाबीचा समावेश केलेला आहे.

लाभार्थी   खाजगी संस्था                   सार्वजनिक उपक्रम

            ५० टक्के कमाल                 १०० टक्के कमाल

            रु. १०.०० लाख                  रुपये २० लाख

 

 

१६) हरीतगृह मल्चींग, शेडनेट, प्लास्टीक टनेल व सामुहीक तळे योजना

      शेतक-यांना आधुनिक तंत्रज्ञानामध्ये फलोत्पादन करणे शक्य व्हावे याकरिता प्लास्टीकचा वापर अत्यंत महत्वाचा आहे. बिगर हंगामी पिक घेणे, उच्च प्रतींच्या फुलांचे उत्पादन, उतीसंवर्धन रोपवाटीका, याकरीता हरीतगृहाची तर बाष्पीभवन टाळण्याकरीता व तणांची वाढ होवू नये म्हणून प्लास्टीक आच्छादनांचा वापर करणे गरजेचे आहे. पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये पाणी मिळणेकरीता शेततळ्याचा व ठिबक सिंचनाचा फायदा होतो.

 

घटनिहाय अनुदान


अ.क्र

घटकाचे नाव

शेतकरी वर्ग

अनुदान


हरीतगृह (उच्च तंत्रज्ञान)

१००० चौ.मि. क्षेत्रमर्यादा

अल्प व अत्यल्प भूधारक

५० टक्के कमाल रु. ३२५/ प्रती चौ.मि.

 

 

इतर

३३.३३ टक्के कमाल रु.२१५/ प्र.चौ.मि.

 

हरीतगृह (सर्वसाधारण)

१००० चौ.मि. क्षेत्रमर्यादा

अल्प व अत्यल्प भूधारक

५० टक्के कमाल रु. १२५/ प्रति चौ.मि.

 

 

इतर

३३.३३ टक्के कमाल

रु.८३/ प्र.चौ.मि.


मल्चिंग (२.०० हे.क्षेत्र मर्यादा)

सर्व

५० टक्के कमाल रु. ७०००/ प्रती हे.


शेडनेट (२.०० हे.क्षेत्रमर्यादा)

सर्व

५० टक्के कमाल रु. ७/- प्रती चौ.मि.


प्लास्टीक टनेल (०.५० हे. पर्यत मर्यादा)

सर्व

५० टक्के कमाल रु. ५/- प्रति चौ.मी.


सामुहीक तळे(१० हे. पर्यत मर्यादा)

सर्व

रुपये ५ लाख पर्यत.

१७) सेंद्रीय शेती पध्दती

जागतीक बाजारपेठेमध्ये सेंद्रीय पध्दतीने पिकविलेल्या शेतीमालाची मागणी विचारात घेता सेंद्रीय घटकांचा वापर करून. विषमुक्त फळे व भाजीपाला निर्मिती करण्याकरीता व जमिनीची सुपिकता टिकविण्यासाठी या बाबींचा समावेश केलेला आहे. पर्यावरणाचा समतोल राखून शेती उत्पादन खर्च कमी करण्यास निश्चित मदत होणार आहे.

अ. सेंद्रीय शेतीपध्दतीचा अवलंब हिरवळीची खते, जैविक किटकनाशके, जैविक खते, गांडूळ खत, जिवामृत, बिजामृत दशपर्णी अर्क, इ. बाबींचा समावेश करून प्रात्यक्षीके घेणे अपेक्षीत आहे.

लाभार्थी शेतकरी

अनुदान ५० टक्के कमाल रुपये ३००००/ प्रती केंद्र

क)               सेंद्रीय शेती प्रमाणिकरण उत्पादीत झालेल्या मालास उत्तम बाजार मिळणेकरीता व आंतरराष्ट्रीय निकषांचे पालन व्हावे याकरीता सेंद्रीय शेतीमाल प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे.

लाभार्थी शेतकरी समुह,

अनुदान रु.५.०० लाख प्रती ५० हे. क्षेत्राकरीता.
१८) नाविण्यपूर्ण उपक्रम

अ) गुणात्मक वाढ व स्वयंरोजगार निर्मिती यामध्ये फळे भाजीपाला प्रक्रीया, काजू प्रक्रीया, स्थायी व फिरती रसवंतीगृह, कांदा प्रतवारी, आळींबी उत्पादन, पुष्पोत्पादनातील मुल्यवर्धन, सुगंधी प्रक्रीया, मसाले प्रक्रीया या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.

लाभार्थी शेतकरी, शेतकरी समुह, सहकारी संस्था, विविध पिक उत्पादक संघ, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, निमशासकीय संस्था, कृषि उद्योजक इ.

अनुदान २५ टक्के कमाल रुपये ५.००

ब) ग्रामीण व शहरी भागात परसबागेत पौष्टीक फळबाग लागवड.

लाभार्थी कुटंब / संस्था

अनुदान रुपये ५००/- किंमतीपर्यत बियाणे / रोपे

क)               उद्यानपंडीत पुरस्कार फलोत्पादन क्षेत्रात काम करणा-यांस प्रोत्साहन देवून इतर शेतक-यांना मार्गदर्शन व्हावे याकरीता ही बाब समाविष्ट करण्यात आलेली आहे.

लाभार्थी शेतकरी, सहकारी संस्था, बागायतदार संघ, इ.

अनुदान रोख रक्कम रुपये १५०००/- प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह. 

अ)     अर्जाचा नमुना (बियाणे उत्पादन)

कार्यक्रमात राबविण्याचा घटक बियाणे उत्पादन

१)      योजनेचे नाव राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत भाजीपाला विकास कार्यक्रम सन २००५ ०६

२)     सार्वजनिक / खाजगी क्षेत्रातील लाभार्थीचे नांव

३)     संपूर्ण पत्ता

४)     कृषि विभागाकडून    अ) प्राप्त केलेल्या बियाणे विक्री परवाना क्रमांक व दिनांक

ब) परवाना मुदत

५) बिजोत्पादन कार्यक्रम - अ) पिकाचे नाव

                        ब) पिकाचे वाण

                        क) क्षेत्र

६) उपरोक्त घटक राबविण्यात येण्याचे ठिकाण

                              तालुका -           जिल्हा

७)संस्थेचा प्रस्तावीत भौतिक कार्यक्रम व त्यासाठी अर्थसहाय्याची प्रकल्पनिहाय मागणी (रुपये लाखात)

 

दिनांक -                          संस्थेचे नाव (सार्वजनिक / खाजगी)

 

 

ठिकाण -                          (संस्था प्रमुखाची स्वाक्षरी व हुद्दा)

 

ब) अर्जाचा नमुना (रोपे उत्पादन)

  

- कार्यक्रमात राबविण्यात घटक रोपे उत्पादन

१) योजनेचे नांव राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत भाजीपाला विकास कार्यक्रम सन २००५ ०६

२) सार्वजनिक / खाजगी क्षेत्रातील लाभार्थीचे नांव

३) संपूर्ण पत्ता

 

 

 

४) कृषि विभागाकडून अ) प्राप्त केलेला रोप विक्री परवाना (असल्यास) क्रमांक व दिनांक

                 

 

                  ब) परवाना मुदत

 

५) रोपे उत्पादन     अ) पिकाचे नांव -

 कार्यक्रम

                  ब) पिकाचे वाण

                  क) क्षेत्र

६) उपरोक्त घटक राबविण्यात येण्याचे ठिकाण

                  तालुका -                       जिल्हा

७) संस्थेचा प्रस्तावीत भौतिक कार्यक्रम संस्था, शेतकरीनिहाय व त्यासाठी अर्थसहाय्याची प्रकल्पनिहाय मागणी (रुपये लाखात)

 

दिनांक -                 संस्थेचे नाव(सार्वजनिक / खाजगी)

 

 

 

 

ठिकाण -                 (संस्था प्रमुखाची स्वाक्षरी व हुद्दा)

 

 

 

 

 

 

 

 

परिशिष्ट

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान

क्षेत्र विस्तार कार्यक्रमांतर्गत केळी / द्राक्ष फळपिकाकरिता अनुदान मिळणेसाठी करावयाचा अर्ज

 

      प्रती, तालुका कृषि अधिकारी /

            जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

      विषय राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत अनुदान मिळणेबाबत.....

महोदय,

      मि माझ्या स्वतःच्या मालकीच्या जमिनीत द्राक्ष / केळीची लागवड करू इच्छीत आहे.

अ.क्र. भूमापन क्रमांक व पौटहिस्सा क्रमांक जमिनीचा प्रकार  फळपिकाचे नांव जात क्षेत्र

                                                               

 
      शासनाने या जोजनेच्या नियम व अटी प्रमाणे मी द्राक्ष / केळी या फळपिकाची लागवड करील. मी स्वतः व माझ्या घरातील कार्यक्षम व्यक्ती योजनेंतर्गत लागवड / लागवड मशागत व देखभाल इ. कामे फळपिकाची योग्य जोपासना करील. लागवड केलेल्या सदरहू फळपिकाच्या एकूण रोपांपैकी किमान ९- ट्क्के जिवंत राकण्याची जबाबदारी मी स्वतः स्वीकारत आहे.

      मी सदर फळपिकांचा पीक विमा उतरविला असून त्याचे विमा पॉलिसीचा क्रमांक आहे.

      करीता विनंती की, मला उपरोक्त योजनेंतर्गत सहभागी करून घ्यावे व योजनेंतर्गत देय अनुदान माझे               या बँकेतील खाते क्रमांक           मध्ये जमा करण्यात यावे, ही विनंती.

 

सोबतः ७/१२ व ८ अ चा उतारा जोडला आहे.

                                                      आपला विश्वासू,

                                                            सही

गाव               मु.पो.        ता.                      जिल्हा

                              (                                   )

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फुलपिकाच्या नविन बगीच्याची स्थापना करणे या घटकांतर्गत अर्थसहाय्य मिळण्याकरीता अर्ज

१. लाभार्थिचे नांव

२.    अ) लाभार्थ्याचा पत्ता

      ब) दूरध्वनी क्रमांक

३.    अ) फुलपिकांचा बगीचा ज्या ठिकाणी स्थापना करावयाचा आहे त्या ठिकाणचा    पत्ता-  ब) दूरध्वनी क्रमांक

४. फुलपिकांचा बगीचा ज्या ठिकाणी स्थापन करावयाचा आहे त्या क्षेत्राचा गट क्रमांक

   (७/१२ उतारा /८-अ उतारा जोडावा)ः-

५. लाभार्थ्याची वर्गवारी अत्याल्प / अल्प भूधारक / इतर भूधारक

६. पाणीपुरवठ्याच्या उपलब्ध सोयी विहीर / विंधन विहीर / कँनाल / उपसा सिंचन

७. पाणीपुरवठ्याची बगीच्याचे क्षेत्र

८. फुलपिकाच्या प्रकार कट फ्लॉवर / कंदवर्गीय फुले / सुटी फुले

९.    अ) फुलपिकाचे नाव

      ब) वाण

१०. फुलपिकांच्या लागवडीसाठी येणारा एकूण खर्च तपशिल

      अ) जमिन तयार करणे रु.

      ब) लागवड साहित्य रु

      क) पाणी पुरवठ्यासाठी ठिबक / तुषार सिंचन संच रु

      ड) सेंद्रीय खते / रासायनिक खते (तपशिलवार) रु.

      इ) किटकनाशके / बुरशीनाशके रु.

      ई) फुलपिकांच्या बगीचा स्थापन करण्याकरीता लागणारी मजूरी रु.

      प) इतर किरकोळ खर्च रु.

      फ) एकूण खर्च रु.

११. अनुदानाची मागणी रक्कम रुपये

      तरी कृपया......................क्षेत्रामध्ये उत्पादीत करावयाच्या..............फुलपिकाच्या

.............. वाणांच्या उत्पादन करण्याकरिता येणारा खर्च रुपये.....................पैकी देय असणारे अनुदान माझे................ या बँकेत शाखा बचत खाते क्र.............. मध्ये जमा करावी ही विनंती.

१२. मी यापुर्वी पुष्पोत्पादन योजनेअंतर्गत या घटकाचा लाभ घेतलेला नाही / आहे.

                                                      स्वाक्षरी

                                    नाव-

 

(परिशिष्ट)

योजनेत लाभ घेण्याविषयी लाभार्थीचे विनंतीपत्र

प्रती,

तालुका कृषि अधिकारी

तालुका...........जिल्हा.............

विषयः राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फलोत्पादन विकास योजना लाभ घेण्यांबाबत.

     

      मी माझ्या स्वतःच्या मालकीच्या जमिनीत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फळबाग लागवड करू इच्छित आहे. माझ्या मी धारण केलेल्या जमिनीसंबधी माहिती खालीलप्रमाणे आहे.

१.     शेतक-यांचे नाव / संस्थेचे नाव -

२.    गाव                           तालुका

३.    लाभार्थ्याची वर्गवारी (अनु.जाती/ अनु.जमाती/ भटक्या विमुक्त/ महिला / इतर)

      एकूण क्षेत्र ८-अ प्रमाणे लागवडीचा भूमापन क्रमांक             क्षेत्र

४.    संयुक्त खातेदार असल्यास अर्जदाराच्या हिश्याचे प्रमाणानुसार

      क्षेत्र         हेक्टर भुमापन क्रमांक                  क्षेत्र

५.    ८-अ प्रमाणे एकूण जमीन धारणा -       क्षेत्र         हेक्टर

      भूसंपादन क्रमांक                       क्षेत्र

६.    लागवड करु इच्छीत असलेल्या क्षेत्राव्यतीरीक्त व इतर गावांतील एकूण अर्जदाराने  गावनिहाय ८-अ प्रमाणे जमीन धारणा

६. अ  शासकीय योजनेंतर्गत पूर्वी फळबाग लागवड केली असल्यांस तपशिल


वर्ष

फळपिकाचे नाव

लागवड क्षेत्र (हे)

गट क्र. क्षेत्र(हे)

लावलेल्या झाडांची

एकूण संख्या

सध्या जिवंत

झाडांची संख्या

राष्ट्रीय फलोत्पादन

अभियानांतर्गत व्यतिरीक्त इतर लागवड केली असल्यास योजनेचे नाव 

७.                 जमिनीचा प्रकार (हलकी / मध्यम / भारी / कातळ / पडीक)

८.                  पडीक जमिनीवर फळबाग लागवड करावयाची असल्यास

अ)जमिन किती वर्षापासून पडीक आहे.  ब)जमिन पडीक ठेवण्याची संक्षीप्त कारणे

९.    राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फळबाग लागवड कार्यक्रमाखालील फळपिकाचे  नांव

      अ)          क्षेत्र (हेक्टर)

१०.    संयुक्त खातेदार असल्यास त्याचे हिश्श्यांचे क्षेत्राप्रमाणे द्यावयाया लाभ

      फळपिकाचे नाव अ)        क्षेत्र (हे)           ब)          क)

११.    फळबागेसाठी उपलब्ध ओलिताचे साधन

      (विहीर, लिफ्ट, कँनाल, नदी)

१२.   ओलिताचे साधन नसल्यास लागवडीपासून पहिल्या दोन / वर्षात पाण्याची व्यवस्था कोणत्या प्रकारे करण्यात येणार आहे.

      शासनाने विहित केलेल्या या नियम व अटीप्रमाणे वर नमूद केलेल्या फळझाडांची लागवड करीन. व माझ्या घरातील कार्यक्षम व्यक्तींस या करिता राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत प्रमाणीत मजूर म्हणून घोषित करण्यास तयार असून, फळझाड पिकांची लागवड केल्यानंतर त्यांची सुयोग्य जोपासना करीन. तेव्हा मला सदर योजनेत सहभाग करून घ्यावे ही विनंती.

सोबत - ७/१२ चा उतारा व ८-अ जोडला आहे.

                                                आपला विश्वासू,

                                               

 

 

स्थळ                                            (शेतक-यांचे नाव)

 

दिनांक                                                 (संस्था)

 

प्रपत्र

शेतक-याने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या नावे राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत भाग घ्यावयासाठी करावयाचा अर्ज

                                    ठिकाण

                                  दिनांक-

 

प्रती,

मा. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,

...............................................

 

      विषय राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत सन २००५-०६ या वर्षात लाभ घेण्यासाठी करावयाचा अर्ज.

 

महोदय,

१) मी श्री...........................या..............................गावचा रहिवाशी शेतकरी असून माझ्याकडे.......................हेक्टर क्षेत्र आहे. सदरचा क्षेत्रावर मी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत हरितगृह / शेडींगनेट / मल्चिंग / प्लँस्टीक टनेल या घटकाचा सन २००५-०६ या वर्षामध्ये लाभ घेऊ इच्छितो. सोबत मी माझा जमिनीचा ७/१२ उतारा जोडत आहे. तरी कृपया मला पूर्व संमती द्यावी. ही विनंती.

२) आम्ही शेतकरी समुदाय १) श्री...............................२) श्री.........................३) श्री..........................४) श्री...................... या......................गावचे रहिवाशी शेतकरी असून आमच्याकडे अनुक्रमे ............................आणि ....................... हेक्टर क्षेत्र आहे. या क्षेत्रावर आम्ही राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत सामुहीक तळे या घटकाचा सन २००५-०६ या वर्षामध्ये लाभ घेऊ इच्छितो. सोबत आमच्या जमिनीचे ७/१२ उतारे जोडत आहोत. तरी कृपया आम्हांस पूर्वसंमती द्यावी, ही विनंती.

३) योजनेअंतर्गत मंजूर होणारे अनूदान माझे / आमचे .................... या बँकेतील खाते क्रमांक ................ मध्ये जमा करण्यात यावे.

 

आपले नम्र                                       आपला नम्र

                                          १)...................................

                                          २)..................................

                                          ३)..................................

                                          ४)..................................

प्रपत्र - ३

शेतक-याने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या नावे राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत भाग घ्यावयासाठी करावयाच्या अर्ज

                                          ठिकाण-

                                          दिनांक-

प्रती,

मा.जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,

 

      विषय राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत सन २००५-०६ या वर्षात लाभ घेण्यासाठी करावयाचा अर्ज.

 

महोदय,

 

१) मी श्री......................या.......................गावचा रहिवाशी शेतकरी असून माझ्याकडे ......................... हेक्टर क्षेत्र आहे. सदरच्या क्षेत्रावर मी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत सेंद्रीय शेती पध्दतीचा अवलंब / गांडूळ कल्चर तथा खत उत्पादन केंद्र उभारणी / सेंद्रीय शेती पध्दती प्रमाणीकरण प्रकल्प या घटकांचा सन २००५ ०६ या वर्षामध्ये लाभ घेऊ इच्छितो. सोबत मा माझा जमिनीचा ७/१२ उतारा जोडत आहे. तरी कृपया मला या घटकांसाठी मंजूरी देऊन अनुदान मिळावे, ही विनंती.

२) योजनेअंतर्गत मंजूर होणारे अनुदान माझे .................... या बँकेतील खाते क्रमांक ............... मध्ये जमा करण्यात यावे.

 

 

                                                आपला नम्र

 

                                             ( शेतक-याचे नाव )

 

 
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत मधुमक्षिका पालन योजनेंतर्गत सहभागासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना.

 

प्रती,

अध्यक्ष,

जिल्हा फलोत्पादन अभियान

द्वारा मंडळ कृषि अधिकारी कार्यालय....................

तालुका................ जिल्हा...............................

 

      विषय राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत मधूमक्षिका पालन योजना.

 

योजनेअंतर्गत लाभ मिळणेबाबत

 

महोदय,

 

मी / आम्ही विषयांकीत योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढीलप्रमाणे माहिती सादर करीत आहे / आहोत.

१) लाभार्थी / लाभार्थी संस्थेचे नाव

पत्ता-गाव................................तालुका...............................जिल्हा........................

पिन....................... फोन नं............................. / फँक्स नं..............इ-मेल...........

२) धारण केलेल्या जमिनीचा तपशील

अ) सर्व्हे / गट क्र.                           ब) ८/अ नुसार क्षेत्र

३) लाभार्थ्याची वर्गवारी- (अनु. जाती, अनु.जमाती, भटक्या विमुक्त जाती / जमाती, महिला इतर)

४) जमिनीचा प्रकार हलकी / मध्यम / भारी

५) अस्तीत्वात असलेली पिक पध्दतीचा तपशिल

६) ओलीताची सोय   आहे/नाही     (ओलीताचा प्रकार-बारामाही / आठमाही)

७) सेंद्रीय पिक पध्दतीचा वापर करतात का.                        होय/नाही

८) एकात्मिक पिक संरक्षण पध्दतीचा अवलंब करतात का.            होय/नाही

९) मधुमक्षिका पालनाबाबत प्रशिक्षण घेतले आहे का.           होय/नाही

 

      वरील प्रमाणे मी / आम्ही दिलेली माहिती वस्तुस्थिती दर्शक असून मला / आम्हाला सदरच्या योजनेत सहभागी करून घेतल्यास शासनाने विहित केलेल्या नियमांचे मी / आम्ही पालन करू व मधुमक्षिका पालनाविषयी शासनाने / कृषि विभागातील क्षेत्रीय अधिका-यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे मी / आम्ही पालन करू. मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय शास्त्रीचदृष्ट्या योग्य त-हेने करण्याची हमी देत आहे.

 

      तरी सदरच्या योजनेत मला / आम्हांला सहभागी करून घेण्यात यावे ही विनंती.

 

ठिकाण -           लाभार्थीचे नाव / लाभार्थ्यांचे नाव                स्वाक्षरी

 

दिनांक

 

 

 
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत शेतक-यांच्या शेतीवरील प्रात्यक्षिके / चांगली शेती करण्याची प्रात्यक्षिके (गँप प्रात्यक्षिके) योजनेंतर्गत सहभागासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना

 

प्रती,

अध्यक्ष,

जिल्हा फलोत्पादन अभियान समिती,

द्वारा मंडळ कृषि अधिकारी कार्यालय

तालुका                   जिल्हा

 

विषय राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत विविध प्रात्यक्षिके योजना.

     शेतक-यांना शेतावरील प्रात्यक्षिके / चांगली शेती करण्याची प्रात्यक्षिके

     (गँप प्रात्यक्षिके) योजने अंतर्गत लाभ मिळणेबाबत

 

महोदय,

मी / आम्ही विषयांकित योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढीलप्रमाणे माहिती सादर करीत आहे / आहोत.

 

१) लाभार्थी / लाभार्थी संस्थेचे नाव

पत्ता-गाव............................तालुका.............................जिल्हा.............................

पिन.......................फोन नं. / फँक्स नं...................... इ-मेल..........................

२) धारण केलेल्या जमिनीचा तपशील

अ) सर्व्हे / गट क्र.               ब) ८/अ नुसार क्षेत्र-

३) लाभार्थ्याची वर्गवारी (अनु. जाती, अनु. जमाती, भटक्या विमुक्त जाती/ जमाती, महिला इतर)

४) जमिनीचा प्रकार हलकी / मध्यम / भारी

५) अस्तीत्वात असलेली पिक पध्दतीचा तपशील

६) ओलीताची सोय               आहे/नाही     (ओलीताचा प्रकार-बारमाही/आठमाही)

७) सेंद्रीय पिक पध्दतीचा वापर करतात का.                        होय/नाही

८) एकात्मिक पिक संरक्षण पध्दतीचा अवलंब करतात का.            होय/नाही

 

      वरील प्रमाणे मी / आम्ही दिलेली माहिती वस्तूस्थीती दर्शक असून मला / आम्हाला सदरच्या योजनेत सहभागी करून घेतल्यास शासनाने विहित केलेल्या नियमांचे मी / आम्ही पालन करू व उपरोक्त प्रात्यक्षिकांचे आयोजनासाठी शासनाने / कृषि विभागातील क्षेत्रिय अधिका-यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे मी / आम्ही पालन करू. ही प्रात्यक्षिके शास्त्रीयदृष्ट्या योग्य त-हेने करण्याची हमी देत आहे.

 

तरी सदरच्या योजनेत मला / आम्हाला सहभागी करून घेण्यात यावे हि विनंती.

 

ठिकाण            लाभार्थ्याचे नाव / लाभार्थ्यांची नावे              स्वाक्षरी

 

दिनांक

 

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत पँक हाउस स्थापन करणेसाठी अर्थसहाय्य मिळणेकरीता अर्ज.

 

प्रती,

सदस्य सचिव,

जिल्हा अभियान समिती तथा

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

जिल्हा................................

 

      विषय राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत पँक हाऊस स्थापन करणे या योजनेचा लाभ मिळणेबाबत.

 

महोदय,

      राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत पँक हाऊस स्थापन करणेसाठी अर्थसहाय्य या बाबीचा लाभ घेण्यासाठी अनुषंगीक माहिती.

१) लाभार्थ्याचे नांव

पत्ता

फोन / फँक्स नंबर

ई-मेलचा पत्ता

२) पँक हाऊस जेथे उभारावयाचे आहे तेथील पत्ता

३) कोणत्या पिकांसाठी पँक हाऊस उभारण्यात येत आहे.

४) प्रकल्पाची जागा स्वतःच्या मालकीची असल्यास ७/१२ अ, नसल्यास भाडेपट्टी करारनामा / लिजडिड द्यावा.

५) प्रकल्प अहवाल कर्ज मंजूरीसाठी ज्या वित्तीय संस्थेकडे सादर केला आहे. त्याचा तपशील (संस्थेचे नांव व पत्ता, अहवाल केव्हा सादर केला इत्यादी) सोबत जोडला आहे.

बँकेचे नाव शाखा,              प्रकल्प अहवाल बँकेस सादर केल्याची तारीख-

६) वित्तीय संस्थेन प्रकल्प अहवालानुसार कर्ज मंजूर केल्याची रक्कम व तारीख (सोबत पत्राची प्रत जोडावी)

      याचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

      कर्ज मंजूर रक्कम रू.      अ)टर्म लोन रू.      ब) कँश क्रेडीट रू.

      कर्ज मंजूरी दिनांक         अ)टर्म लोन रू.      ब) कँश क्रेडीट रू.

      कर्ज वितरीत रक्कम रू.    अ)टर्म लोन रू.      ब) कँश क्रेडीट रू.

      कर्ज वितरीत दिनांक       अ)टर्म लोन रू.      ब) कँश क्रेडीट रू.

७) ज्या बँकेने कर्ज मंजूर केले आहे तेथील खाते क्रमांक इत्यादी पुढीलप्रमाणे आहे.

(पास बुकाची सत्यप्रत जोडावी) कर्ज खाते क्रमांक

८) प्रकल्प अहवालाची प्रत सोबत जोडली आहे.

९) लाभधारकाच्या वतीने विविध कागदपत्रावर सह्या करण्यासाठी अधिकारपत्र दिले असल्यास त्याबाबतचे अधिकार पत्र सोबत जोडले आहे.

१०) एनएचबी / एमएफपीआय / एसएफएसी / अपेडा किंवा इतर संस्थेकडे अर्थसहाय्य मागीतले असल्यास त्याबाबतचे कागदपत्र व तपशील सोबत जोडला आहे.

११) प्रकल्प उभारणीसाठी बाबनिहाय झालेला खर्च

      १) इमारत बांधकाम        २) मशिनरी

      ३) विद्युतीकरण            ४) एकूण खर्च

१२) इतर अनुषंगिक जोडलेला कागद पत्राचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

१३) सदर योजनेअंतर्गत सन २००५ ०६ मध्ये पँक हाऊस उभारणीसाठी फर्मला रू.............. एवढा खर्च झालेला आहे.

      सदर खर्चाच्या २५ टक्के रक्कम रु............. लाख अनुदान मिळण्यास विनंती आहे.

 

                                          आपला,

 

                              लाभार्थ्यांचे फर्मचे नांव व सही.

 

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत शितगृह स्थापन करणेसाठी अर्थसहाय्य मिळणेकरता अर्ज

 

प्रती,

सदस्य सचिव,

जिल्हा अभियान समिती तथा

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

 

      विषय राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत शितगृह स्थापन करणे या योजनेचा

            लाभ मिळणेबाबत.

 

महोदय,

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शितगृह स्थापन करणेसाठी अर्थसहाय्य या बाबीचा लाभ घेण्यासाठी अनुषंगीक माहीती खालीलप्रमाणे आहे.

१) लाभार्थ्याचे नांव

पत्ता

फोन नं. / फँक्स नंबर

ई-मेलचा पत्ता-

२) शितगृहाचे नाव व पत्ता

३) साठविण्यात येणारी फळे / अनुषंगीक पदार्थ व क्षमता

४) प्रकल्पाची जागा स्वतःचा मालकीची असल्यास ७/१२ व ८ अ, उतारा नसल्यास नोटराईज भाडेपट्टी करारनामा / लिजडिड द्यावा.

५) प्रकल्प अहवाल कर्ज मंजूरीसाठी ज्या वित्तीय संस्थेकडे सादर केला आहे त्याचा तपशिल (संस्थेचे नाव व पत्ता, अहवाल केव्हा सादर केला इत्यादी) सोबत जोडला आहे.

 

बँकेचे नाव शाखा,        प्रकल्प अहवाल बँकेस सादर केल्याची तारीख

 

६) वित्तीय संस्थेने प्रकल्प अहवालानुसार कर्ज मंजूर केल्याची रक्कम व तारीख (सोबत पत्राची प्रत जोडावी) याचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

      कर्ज मंजूर रक्कम रु.       अ)टर्म लोन रू.            ब)कँश क्रेडीट रु.

      कर्ज मजूरी दिनांक

      कर्ज वितरीत रक्कम रु.     अ)टर्म लोन रु.            ब) कँश क्रेडीट रु.

      कर्ज वितरीत दिनांक      

७) ज्या बँकेने कर्ज मंजूर केले आहे तेथील खाते क्रमांक इत्यादी तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

(पासबुकाची सत्यप्रत जोडावी) कर्ज खाते क्रमांक

८) प्रकल्प अहवालाची प्रत सोबत जोडली आहे.

९) लाभधारकाच्या वतीने विविध कागदपत्रावर सह्या करण्यासाठी अधिकारपत्र दिले असल्यास त्याबाबतचे अधिकार पत्र सोबत जोडले आहे.

१०) एनएचबी / एमएफपीआय / एसएफएसी / अपेडा किंवा इतर संस्थेकडे अर्थसहाय्य मागीतले असल्यास त्याबाबतचे कागदपत्र व तपशील सोबत जोडला आहे.

११) प्रकल्प अहवालानुसार साठविण्यात येणा-या मालाच्या उपलब्धतेचा संक्षिप्त तपशील

१२) प्रकल्प उभारणीसाठी बाबनिहाय झालेला खर्च

      १) इमारत बांधकाम -            २) मशीनरी

      २) विद्युतीकरण                  ४) एकुण खर्च

१३) इतर अनुषंगीक जोडलेल्या कागद पत्राचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

१४) सदर योजनेअंतर्गत सन २००५-०६ मध्ये शितगृह उभारण्यासाठी फर्मला एकूण रू.....................एवढा खर्च झालेला आहे. सदर खर्चाच्या देय असणारे अनुदान मिळण्यास विनंती आहे.

 

                                                आपला,

 

                                    लाभार्थ्याच्या फर्मचे नांव व सही

 

 
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत वातानुकुलीत वाहने खरेदी करणेसाठी अर्थसहाय्य मिळणेकरता अर्ज

प्रती,

सदस्य सचिव,

जिल्हा अभियान समिती तथा

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

जिल्हा

 

      विषय राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत शितगृह स्थापन करणे या योजनेचा लाभ मिळणेबाबत

 

महोदय,

      राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत वातानुकुलीत वाहन खरेदी करणेसाठी अर्थसहाय्य या बाबीचा लाभ घेण्यासाठी अनुषंगीक माहिती खालीलप्रमाणे आहे.

१) लाभार्थ्याचे नांव -

पत्ता

फोन नं. / फँक्स नंबर

इमेलचा पत्ता-

२) वातानुकुलीत वाहनाचा तपशील १)कंपनीचे नांव            २) क्षमता

३) कोणत्या फळपिकासाठी वापर करण्यात येणार आहे.

४) प्रकल्प अहवाल कर्ज मंजूरीसाठी ज्या वित्तीय संस्थेकडे सादर केला आहे त्याचा तपशिल (संस्थेचे नांव व पत्ता, अहवाल केव्हा सादर केला इत्यादी) सोबत जोडला आहे.

बँकेचे नाव शाखा               प्रकल्प अहवाल बँकेस सादर केल्याची तारीख

५) वित्तीय संस्थेने प्रकल्प अहवालानुसार कर्ज मंजूर केल्याची रक्कम व तारीख (सोबत पत्राची प्रत जोडावी) याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

      कर्ज मंजूरी रक्कम रु.            अ)टर्म लोन रु.      ब)कँश क्रेडीट रु.

      कर्ज मंजूरी दिनांक         अ)टर्म लोन रू.      ब)कँश क्रेडीट रू.

      कर्ज वितरीत रक्कम रु.     अ)टर्म लोन रु.      ब)कँश क्रेडीट रु

      कर्ज वितरीत दिनांक       अ)टर्म लोन रु.      ब)कँश क्रेडीट रू.

६) ज्या बँकेने कर्ज मंजूर केले आहे तेथील खाते क्रमांक इत्यादी तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

(पास बुकाची सत्यप्रत जोडावी) कर्ज खाते क्रमांक

७) प्रकल्प अहवालाची प्रत सोबत जोडली आहे.

८) लाभधारकाच्या वतीने विविध कागदपत्रावर सह्या करण्यासाठी अधिकारपत्र दिले असल्यास त्याबाबतचे अधिकारपत्र सोबत जोडले आहे.

९) एनएचबी / एमएफपीआय / एसएफएसी / अपेडा किंवा इतर संस्थेकडे अर्थसहाय्य मागीतले असल्यास त्याबाबतचे कागदपत्र व तपशील सोबत जोडला आहे.

१०) प्रकल्प अहवालानुसार सदर वातानुकुलीत वाहनाचा तपशील द्यावा.

११) सदर शीतवाहन खरेदीसाठी झालेला खर्च.

१२) इतर अनुषंगिक जोडलेल्या कागद पत्राचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

१३) सदर योजनेअंतर्गत सन २००५-०६ मध्ये वातानुकुलित वाहन खरेदीसाठी फर्मला एकूण रु...........................एवढा खर्च झालेला आहे. सदर खर्चाच्या २५ टक्के रक्कम रु......................... लाख अनुदान मिळण्यास विनंती आहे.

 

 

                                                      आपला,

 

                                          लाभार्थ्याच्या फर्मचे नाव व सही

फुलांसाठी प्रतवारी गृह (Sorting Grading House) / पँक हाउस / पूर्वशितकरण केंद्र (Pre-Cooling unit) / शितगृह (Cold Storage) उभारणी करणेसाठी अर्थसहाय्य मिळणेकरीता अर्ज.

प्रती,

सदस्य सचिव,

जिल्हा अभियान समिती तथा

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

जिल्हा

     

      विषय- राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत फुलांसाठी अ)प्रतवारी गृह (Sorting Grading House) / पँक हाउस / ब) पूर्वशितकरण केंद्र (Pre-Cooling unit) / क)  शितगृह (Cold Storage) उभारणी करणे या योजनेचा लाभ मिळणेबाबत.

 

महोदय,

      राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फुलांसाठी वरील घटक स्थापन करणेसाठी अर्थसहाय्य या बाबीचा लाभ घेण्यासाठी अनुषंगीक माहिती खालीलप्रमाणे आहे.

१) लाभार्थ्याचे नांव

२)    अ) पत्ता

      ब) फोन नंबर             क)फँक्स नंबर-            ड)इमेलचा पत्ता-

३) अ वरील घटक जेथे उभारावयाचे आहे तेथील पत्ता

ब) फोन नंबर

४) बांधकाम करावयाच्या घटकाची साठवण क्षमता- ........................फुले

५) प्रकल्पाची जागा स्वतःचा मालकीची असल्यास ७/१२ व ८ अ उतारा नसल्यास नोंदणीकृत भाडेपट्टी करारनामा / लिजडीड द्यावा.

६) प्रकल्प अहवाल कर्ज मंजूरीसाठी ज्या वित्तीय संस्थेकडे सादर केला आहे त्याचा तपशिल (संस्थेचे नांव व पत्ता, अहवाल केव्हा सादर केला इत्यादी) सोबत जोडला आहे.

बँकेचे नाव          शाखा              प्रकल्प अहवाल बँकेस सादर केल्याची तारीख

७) वित्तीय संस्थेने प्रकल्प अहवालानुसार कर्ज मंजूर केल्याची रक्कम व तारीख (सोबत पत्राची प्रत जोडावी) याचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

कर्ज मंजूर रक्कम रु.             अ)टर्म लोन रू.            ब)कँश क्रेडीट रू.

कर्ज मंजूरी दिनांक                                                  

कर्ज वितरीत रक्कम रु.           अ)टर्म लोन रु.            ब)कँश क्रेडीट रु.

कर्ज वितरीत दिनांक

 

८) ज्या बँकेने कर्ज मंजूर केले आहे तेथील खाते क्रमांक इत्यादी तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

(पासबुकाची सत्यप्रत जोडावी) कर्ज खाते क्रमांक

९) प्रकल्प अहवालाची प्रत सोबत जोडली आहे.

१०) लाभधारकाच्या वतीने विविध कागदपत्रावर सह्या करण्यासाठी अधिकारपत्र दिले असल्यास त्याबाबतचे अधिकार पत्र सोबत जोडले आहे.

११) एनएचबी / एमएफपीआय / एसएफएसी / अपेडा किंवा इतर संस्थेकडे अर्थसहाय्य मागीतले असल्यास त्याबाबतचे कागदपत्र व तपशील सोबत जोडला आहे.

१२) प्रकल्प उभारणीसाठी बाबनिहाय झालेला खर्च

      १)इमारत बांधकाम रु.                  २)यंत्रसामुग्री व उपकरणे रु.

      ३)संपर्क यंत्रणा, वाहतूक, बाजार घटक रु.  ४)एकूण खर्च रु.

१३)इतर अनुषंगीक जोडलेली कागद पत्राचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

१४)सदर योजनेअंतर्गत सन २००५-०६ मध्ये शितगृह उभारण्यासाठी फर्मला एकूण रु...............एवढा खर्च झालेला आहे. सदर खर्चाच्या देय असणारे अनुदान मिळण्यास विनंती आहे.

 

 

                                                आपला,

     

                                          लाभार्थ्याच्या नांव व सही


राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत मुल्यवर्धन व गुणात्मक वाढीद्वारे स्वयंरोजगार निर्मिती या योजनेंतर्गत अर्थसहाय्य मिळणेकरीता अर्ज.

प्रती,

सदस्य सचिव,

जिल्हा अभियान समिती तथा

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

जिल्हा

 

      विषय राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत मुल्यवर्धन व गुणात्मक वाढीद्वारे स्वयंरोजगार निर्मीती या योजनेंतर्गत अर्थसहाय्याचा लाभ मिळणेबाबत

 

महोदय,

      राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत मुल्यवर्धक व गुणात्मक वाढीद्वारे स्वयंरोजगार निर्मीती या योजनेंतर्गत फळे व भाजीपाला प्रक्रीया केंद्र स्थापन करणे / काजू प्रक्रीया केंद्र / (स्थायी / फिरते) फळ रसवंती केंद्र / कांदा प्रतवारी केंद्र / अळिंबी उत्पादन / पुष्पोत्पादनातील मुल्यवर्धन / सुगंधी प्रक्रीया केंद्र / मसाले प्रक्रीया केंद्र यासाठी अर्थसहाय्याचा लाभ घेण्यासाठी अनुषंगीक माहिती खालीलप्रमाणे आहे.

१) लाभर्थ्याचे नांव

पत्ता

फोन / फँक्स नंबर                     इमेलचा पत्ता

२) प्रकल्पाचे नांव / पत्ता

३) उत्पादीत करावयाचे पदार्थ / उपपदार्थ याचा तपशील द्यावा.

४) प्रकल्पाची जागा स्वतःच्या मालकीची असल्यास ७/१२ व ८ अ उतारा नसल्यास नोंदणीकृत भाडेपट्टी करारनामा / लिजीडीड द्यावा.

५) प्रकल्प अहवाल कर्ज मंजूरीसाठी ज्या वित्तीय संस्थेकडे सादर केला आहे त्याचा तपशिल (संस्थेचे नांव व पत्ता, अहवाल केव्हा सादर केला इत्यादी) सोबत जोडला आहे.

बँकेचे नाव          शाखा              प्रकल्प अहवाल बँकेस सादर केल्याची तारीख

६) वित्तीय संस्थेने प्रकल्प अहवालानुसार कर्ज मंजूर केल्याची रक्कम व तारीख (सोबत पत्राची प्रत जोडावी) याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

कर्ज मंजूर रक्कम रु.       अ)टर्म लोन रू.            ब)कँश क्रेडीट रु.

कर्ज मजूरी दिनांक         अ)टर्म लोन रु.            ब)कँश क्रेडीट रु.

कर्ज वितरीत रक्कम रु.     अ)टर्म लोन रु            ब)कँश क्रेडीट रु.

कर्ज वितरीत दिनांक       अ)टर्म लोन रु.            ब)कँश क्रडीट रु.

 

७) कृषि उद्योग संबधीत खात्याकडे नोंदणी केल्याचा क्रमांक व तारीख इत्यादी तपशील पुढीलप्रमाणे आहे.(नोंदणी प्रमाणपत्राची प्रत जोडावी)

      १)डी.आय.सी.नोंदणी क्रमांक                                दिनांक

      २)कंपनी अँक्ट खाली नोंदणी क्रमांक                         दिनांक

      ३)अपेडाकडे नोंदणी क्रमांक                                दिनांक

      ४)खाद्य प्रक्रीय केंद्र, मंत्रालय(एफपीओ) अंतर्गत नोंदणी क्रमांक    दिनांक

८) ज्या बँकेने कर्ज मंजूर केले आहे तेथील खाते क्रमांक इत्यादी तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

(पासबुकाची सत्यप्रत जोडावी) कर्ज खाते क्रमांक

९) प्रकल्प अहवालाची प्रत सोबत जोडली आहे.

१०) लाभधारकाच्या वतीने विविध कागदपत्रावर सह्या करण्यासाठी अधिकारपत्र दिले असल्यास त्याबाबतचे अधिकार पत्र सोबत जोडले आहे.

११) एनएचबी / एमएफपीआय / एसएफसी / अपेडा किंवा इतर संस्थेकडे अर्थसहाय्य मागीतले असल्यास त्याबाबतचे कागदपत्र व तपशील सोबत जोडला आहे.

१२) प्रकल्प अहवालानुसार कच्चा मालाच्या उपलब्धतेचा व उत्पादीत करावयाच्या पदार्थाचा संक्षिप्त तपशिल सोबत जोडला आहे.

१३) प्रकल्प उभारणीसाठी बाबनिहाय झालेला खर्च

      १) इमारत बांधकाम              २)मशिनरी

      ३)विद्युतीकरण                   ४)एकूण खर्च

१४) इतर अनुषंगीक जोडलेली कागद पत्राचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

१५) सदर योजनेअंतर्गत सन २००५-०६ मध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत मूल्यवर्धन व गुणात्मक वाढीद्वारे स्वयंरोजगार निर्मिती या योजनेंतर्गत युनिट उभारणीसाठी लाभार्थ्यास एकूण रु............................एवढा खर्च झालेला आहे. खर्चाच्या २५ टक्के रक्कम रु....................... लाख अनुदान मिळण्यास विनंती आहे.

 

 

 

                                                      आपला,

 

                                                लाभार्थ्याच्या नांव व सही

 

 

बाजार सुविधा केंद्राची स्थापना करण्यासाठी अर्थसहाय्य अर्ज

 

प्रती,

अध्यक्ष, राज्य फलोत्पादन अभियान समिती,

द्वारा संचालक (फलोत्पादन)

कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य

पुणे ४११००५

 

      विषय बाजार केंद्राची स्थापना करण्यासाठी अनुदान मिळणेबाबत

 

महोदय,

      मी / आम्ही बाजार सुविधा केंद्राची स्थापना करण्यासाठी पुढीलप्रमाणे माहीती सादर करीत आहे / आहोत.

१) लाभार्थी / लाभार्थी संस्थेचे पुर्ण नाव -

अ) पत्ता -                      ब) लाभधारकाचा प्रकार

क) फोन नं. / फँक्स नं.          ड) ई-मेलचा पत्ता -

२) बाजार सुविधा केंद्र उभारावयाच्या / निवडलेल्या ठिकाणचा पत्ता

गाव -                         तालुका -           जिल्हा-

दुरध्वनी क्रमांक-           फँक्स क्रमांक

३) केंद्रासाठी निवडलेल्या संस्थेचा तपशिल -

४) बाजार सुविधा केंद्र उभारण्यासाठी केलेल्या प्रकल्प अहवालाची प्रत सोबत जोडली आहे.

५) प्रकल्पाची अंदाजपत्रकीय रक्कम.

६) वित्तीय संस्थेचे / बँकेचे कर्ज घेतले आहे काय ? असल्यास

बँकेचे नाव व पत्ता -                          खाते क्रमांक

(कर्ज मंजूरीची व कर्ज वितरणाची प्रत सोबत जोडावी)

मंजूर रक्कम -                  मंजूरी दिनांक

वितरीत रक्कम -                दिनांक

७) बाजार सुविधा केंद्रासाठी आवश्यक साहित्य खालीलप्रमाणे खरेदी केले आहे.


अ.क्र

मशिन/साहित्याची

वर्णन

आवश्यक संख्या

किंमत प्रती नग

एकूण किंमत

पुरवठादराचे

नांव

बिल क्रमांक व दिनांक

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

८) बाजार सुविधा केंद्राच्या कामकाजासाठी नेमलेल्या अधिकारी / कर्मचा-यांचा तपशील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा