शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१२

सोरायसिसवर प्रभावी उपचार

सोरायसिसवर प्रभावी उपचार - Friday, August 03, 2012 AT 02:00 AM (IST) Tags: agro guide सोरायसिस हा एक त्वचा रोग आहे. यात त्वचेवर लाल चट्टे निर्माण होऊन प्रचंड खाज सुटते. त्वचा जाड होते व त्वचेतून चंदेरी रंगाचे माशाच्या खवल्यांप्रमाणे खवले पडतात. रोगाची सुरवात डोक्‍यात झाल्यास, कोंडा म्हणून याकडे दुर्लक्ष होते. सोरायसिस प्रामुख्याने डोक्‍यात, कानामागे, हाताचे ढोपरे, गुडघे या भागांवर सुरू होतो. म्हणून हा रोग संसर्गजन्य नाही. शरीरातील रोग प्रतिकारशक्तीमध्ये बिघाड झाल्यामुळे हा रोग होतो. सोरायसिस या आजारात रोग प्रतिकारशक्तीत बिघाड निर्माण होतो त्यामुळे जास्त त्वचा निर्माण होते. त्वचेचे थरावर थर जमतात. त्वचा जाड होते. प्रतिकारशक्तीतील बिघाड हा रक्तातील पांढऱ्या पेशीत जनुकीय बदल झाल्यामुळे निर्माण होतो. सोरायसिसचे प्रकार - 1) प्लाक सोरायसिस - त्वचा जाड व कोरडी होते. खूप खाज येते. पांढरा कोंडा भरपूर पडतो. रोगाची सुरवात सांध्यांभोवती होते. उदा. हाताचे ढोपरे, गुडघ्यात हा प्रकार सर्वांत जास्त आढळून येतो. 2) गटेट सोरायसिस - त्वचेवर लहान लहान बिंदूप्रमाणे स्वतंत्र चट्टे पडतात. त्यांना खाज कमी असते व कोंडाही कमी पडतो. रोगाची सुरवात पाठ, छातीपासून होते. हा अतिशय हट्टी प्रकार आहे. 3) पस्टुलर सोरायसिस - त्वचेला सूज येते. त्वचेतून पाणी व पू निघतो. त्वचेला तडे जातात. खवले पडण्याचे प्रमाण जास्त असते. 4) इनव्हर्स सोरायसिस - रोगाची सुरवात सांध्यांच्या खोबणीत होते. उदा. काखेत, जांघेत. या प्रकारात त्वचेला जास्त प्रमाणात सूज येते व खवलेही पडतात. 5) एरिथ्रोडर्मिक सोरायसिस - त्वचा गर्द लाल झाल्यामुळे खूप जळजळ होते. खवले पडण्याचे प्रमाण मात्र कमी असते. 6) नखांचा सोरायसिस - त्वचेप्रमाणे नखांनाही सोरायसिस होतो. नखे जाड होतात, वेडी वाकडी वाढतात. नखांमध्ये वेदना होतात, पण खवले पडत नाहीत. 7) प्लांटर सोरायसिस (तळहात व तळपायांचा सोरायसिस) - यात प्रथम त्वचेचे पापुद्रे निघतात. त्वचेला तडे पडतात. हा प्रकार दुरुस्त होण्यास कठीण असतो. 8) सोरियाटिक आथ्रायटिस - त्वचेच्या सोरायसिसमुळे सांध्यांना संधिवाताप्रमाणे सूज येऊ लागते. प्रथम सुरवात लहान सांध्यांपासून होते. उदा. पायाचा अंगठा, हाताचे बोट. सांध्यांच्या सोरायसिसमध्ये सांधे पूर्णपणे झिजतात. ही झीज कायम स्वरूपाची असते. त्यामुळे हातापायाची बोटे वाकडी होतात. सांधे चिकटतात व कायमस्वरूपी निकामी होतात. होमिओपॅथिक शास्त्रात सोरायसिसवर प्रभावी उपचार आहेत. होमिओपॅथिक औषधांचे शरीरावर कोणतेही दुष्परिणाम नाहीत. होमिओपॅथिक औषधे रोग प्रतिकारशक्तीत निर्माण झालेला बिघाड नाहीसा करून पूर्ववत संतुलन मिळवितात. त्यामुळे उपचार बंद केल्यानंतर 10-15 वर्षांनंतरही पुन्हा सोरायसिस उद्‌भवला नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. सोरीयट्रिट या संशोधन संस्थेत 25 वर्षांपासून 11,000 हून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. संपर्क - 020-65601596 डॉ. सोनावणे, पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा