मंगळवार, १७ जुलै, २०१२

ज्वारी आणि बाजरी लागवडीबाबत माहिती

- सुरेश जाधव, खंडाळा, जि. सातारा ज्वारी लागवड : पेरणीसाठी शिफारस केलेल्या जातीचाच वापर करावा. संकरित वाण - सी.एस.एच. 5, 9, 13, 14, 16, 17, 18, 23, एस.पी.एच. 1567. सुधारित वाण - एस.पी.व्ही. 462, सी.एस.व्ही. 13, सी.एस.व्ही. - 15, सी.एस.व्ही. - 17, पी.व्ही.के. 801, सी.एस.व्ही. 20, 23. गोड ज्वारी- एस.एस.व्ही. 84, सी.एस.व्ही. 24, एस.एस., सी.एस.व्ही. 19, एस.एस., सी.एस.एस. 22 एस.एस. व ए.के.एस.एस.व्ही. 22. मॉन्सूनचा पुरेसा पाऊस झाल्यावर ताबडतोब पेरणी करावी. पेरणीसाठी हेक्‍टरी 10 किलो बियाणे वापरावे. ऍझोटोबॅक्‍टर व पीएसबी जिवाणूची प्रत्येकी 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी. पेरणीच्या वेळी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश द्यावे. (50 किलो नत्र :50 किलो स्फुरद :50 किलो पालाश प्रति हेक्‍टरी) पेरणीनंतर एक महिन्याने 50 किलो नत्राची मात्रा प्रति हेक्‍टरी द्यावी. बाजरी लागवड : मॉन्सून पावसानंतर जमिनीत पुरेशी ओल झाल्यानंतरच पेरणी करावी. पेरणीसाठी शिफारस केलेल्या सुधारित व संकरित वाणांचाच वापर करावा. संकरित वाण - श्रद्धा (आर.एच.आर.बी.एच. 8609), सबुरी (आर.एच.आर.बी.एच. 8924) शांती (आर.एच.आर.बी.एच. - 9808) ओलिताची सोय असेल अशा ठिकाणी शक्‍यतो संकरित वाण पेरावेत. शिफारशीप्रमाणे वरखते वेळेवर द्यावीत. हलक्‍या जमिनीसाठी 40 किलो नत्र, 20किलो स्फुरद, 50 किलो पालाश प्रति हेक्‍टरी द्यावे. मध्यम जमिनीसाठी 50 किलो नत्र, 25 किलो स्फुरद, 25 किलो पालाश प्रति हेक्‍टरी द्यावे. पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करून 45 ु 15 सें.मी. अंतराने पेरणी करावी. बाजरीचे वाणानुसार हेक्‍टरी तीन ते चार किलो बियाणे वापरा. बाजरी अधिक तूर 2:1, 2:2 या प्रमाणात आंतरपीक घ्यावी. कोरडवाहू बाजरीसाठी सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावी.अरगट रोग नियंत्रणासाठी 20 टक्के मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया करावी. गोसावी रोगाच्या नियंत्रणासाठी सहा ग्रॅम मेटॅलॅक्‍झील 35 एसडी (बीजप्रक्रियेसाठीचे) प्रति किलो बियाण्यास चोळावे. त्यानंतर प्रति 10 किलो बियाण्यावर 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर जिवाणू संवर्धक व 250 ग्रॅम स्फुरद जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी. : डॉ. एच. एल. घाडगे, 9850522821 विभागीय विस्तार केंद्र, कृषी महाविद्यालय, पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा