शुक्रवार, १५ जून, २०१२

मत्स्य शेतीसाठी तलाव कसा असावा ? - खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल येथील तज्ज्ञांनी याविषयी माहिती दिली आहे. मत्स्यबीज संगोपनात तळ्यातील पाण्याची नैसर्गिक उत्पादकता ही मातीचा सुपीकपणा आणि गुणवत्ता यावर अवलंबून असते. त्यासाठी जागेची निवड करताना मातीतील गाळ, वाळू आणि चिकणमातीचे प्रमाण, पाणी धरून ठेवण्याची क्षमता या भौतिक गुणधर्मांचा अभ्यास करावा. मातीच्या भौतिक गुणधर्मांमध्ये गाळ, रेती आणि पोयटा (चिकणमाती) यांचे प्रमाण अनुक्रमे 40ः30ः40 टक्के असेल तर अशी माती मत्स्य तलावासाठी अत्यंत चांगली असते. मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता 40 टक्के असायला हवी. पाण्याचे तापमान 20 ते 32 अंश सेल्सिअस असावे. मातीत चिकण मातीचे प्रमाण जास्त असेल तर तळ्यात पाणी दीर्घकाळ टिकून राहते. मातीच्या सामूची पातळी 6.0 ते 8.0 असेल तर अतिशय उपयुक्त, मात्र माती जास्त प्रमाणात आम्लधर्मीय किंवा अल्कधर्मीय असेल तर जिवाणूंची प्रक्रिया मंदावते. मातीतील सर्व घटक तपासण्यासाठी तलावासाठी निवडलेल्या क्षेत्रातील वेगवेगळ्या ठिकाणचे व खोलीचे मातीचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत पृथक्‍करण करावे. ः 022-27452775

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा