शुक्रवार, १५ जून, २०१२

कापसात १८ ते २८, ज्वारीत ५३ टक्के वाढ !

नवी दिल्ली- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने 2012-13च्या खरीप हंगामासाठीच्या विविध धान्यांच्या किमान आधार किमतींना काल (ता. 14) मंजुरी दिली. त्यानुसार भाताच्या (पॅडी) दरात क्विंटलमागे 170 रुपयांनी वाढ करून नवा दर 1250 रुपये निश्‍चित करण्यात आला आहे. ज्वारीच्या दरात क्विंटलला 520 रुपयांनी वाढ करण्यात आली असून, नवा दर 1500 रुपये प्रति क्विंटल इतका असेल. कृषिमूल्य आयोगाने केलेल्या शिफारशी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने आहे तशा स्वीकारल्याचे गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी ही माहिती देताना सांगितले. अन्य धान्यांचे दर पुढीलप्रमाणे : प्रति क्विंटल रुपयांत (कंसात पूर्वीचा दर) - रागी - 1500 (1050), बाजरी - 1175 (980), मका - 1175 (980), उडीद - 4300 (3300), ज्वारी - मालदांडी - 1520 (1000). तेलबियांचे दर -- भुईमूग - 3700 (2700), सूर्यफूल - 3700 (2800), तीळ - 4200 (3400), निगरसीड - 3500 (2900), सोयाबीन (काळा) - 2200 (1650), सोयाबीन (पिवळा) - 2240 (1950). मध्यम लांबीच्या धाग्याच्या कापसाची किंमतदेखील 2800 रुपयांवरून 3600 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. तर, लांब धाग्याच्या कापसाचा दर 3300 रुपयांवरून 3900 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला. युरियाच्या दरात दहा टक्‍क्‍यांनी वाढ करण्याचा निर्णयही पुन्हा रसायन मंत्रालयाकडे फेरविचारासाठी पाठविण्यात आला. मूल्यवाढीचे स्वागत कृषिमूल्य आयोगासमोर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मांडलेल्या अर्थकारणामुळे सरकारला वास्तवाचे भान येण्यास प्रारंभ झाला आहे. आयोगाने केंद्र सरकारकडे केलेल्या शिफारशी जशाच्या तशा स्वीकारल्या, हा शेतकऱ्यांचा मोठा विजय मी मानतो. ज्वारीत 53 टक्‍क्‍यांपर्यंत देण्यात आलेली वाढ निश्‍चितच कोरडवाहू शेतकऱ्यांना आणि शेतीला मदत करणारी ठरेल. उत्पादन खर्च लक्षात घेता वाढ वाजवी नसली तरी इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांना कृषिमूल्य आयोगाने बळ दिले. याचा फायदा चारापिके वाढून जनावरांच्या संगोपनास व शेतीच्या संवर्धनास मदत करणारा ठरेल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा