शनिवार, २१ एप्रिल, २०१२

शेळीच्या जातींची माहिती

- हर्षल गावंडे, मोचर्डा, जि. अमरावती किफायतशीर शेळी व्यवसायाच्या यशाचा पाया म्हणजे त्यांची पैदास; आणि पैदाशीमध्ये मोलाचा वाटा असतो, तो कळपातील पैदाशीच्या नराचा. म्हणूनच 50 माद्यांच्या निवडीपेक्षा एका पैदाशीच्या नराची निवड अत्यंत महत्त्वाची असते. राज्यातील शेळ्यांच्या जातींचा विचार करता उस्मानाबादी ही मांसासाठी उपयुक्त असलेली आणि संगमनेरी ही मांस व दुधासाठी उपयुक्त असलेली जात आहे. पैदाशीसाठी नराची निवड : 1) नर हा कळपातील सुदृढ आणि जातीचे गुणधर्म दर्शविणारा असावा. 2) पैदाशीचा नर चपळ असावा. 3) पैदाशीचा नर निवडताना दोन जुळ्या नरांतील एक चांगला नर निवडावा, म्हणजे पुढील पिढ्यांत जुळे व तिळे करडे देण्याचे प्रमाण वाढते. 4) पैदाशीच्या नराची प्रजोत्पादन क्षमता चांगली असावी. 5) पैदाशीचा नर उंच, लांब, भरदार छाती असणारा व मानेवर आयाळ असणारा असावा. 6) पैदाशीच्या नरात कोणतेही शारीरिक व्यंग नसावे. 7) पैदाशीचा नर जातिवंत माता-पित्यापासून झालेला असावा. 8) नर निवडताना दीड ते दोन वर्षांचा निवडावा. पैदाशीचा नर निवडताना जातीशी साधर्म्य असणारा, दीड ते दोन वर्षे वयाचा, जुळ्यांतील एक असणारा, सुदृढ, उत्तम प्रजोत्पादन क्षमता असणारा निवडावा म्हणजे त्याच्यापासून जन्माला येणारी पुढील पिढी चांगल्या गुणवत्तेची होईल. ------------- संपर्क ः 02426 - 243455 संगमनेरी शेळी संशोधन योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर

१० टिप्पण्या:

 1. mala pan sheli palan vevsay chalu karaycha aahe tar mi kasha prakare chalu kela pahije aani aagodar kiti shelya gheun ha vevsay chalu kela pahije ya sathi anudan bhetel ka mala aani maja kade kiti paise he chalu karnya sathi

  प्रत्युत्तर द्याहटवा
 2. mala pan sheli palan vevsay chalu karaycha aahe tar mi kasha prakare chalu kela pahije aani aagodar kiti shelya gheun ha vevsay chalu kela pahije ya sathi anudan bhetel ka mala aani maja kade kiti paise he chalu karnya sathi

  प्रत्युत्तर द्याहटवा
 3. namskar maj nav rahul kalokhe ahe maja sheli palan vevasay chalu karnar ahe mala aaple marg darshan pahijet tar krupay mala margdarshan kara .mala anudan milel ka

  प्रत्युत्तर द्याहटवा
 4. Namaskar,
  Mala Sheli palan vyavasay karaycha aahe..Osmanabadi athva African Boar jatichya shelya kothe miltil yachi mahiti havi....

  sahakaryachi apeksha karto.

  Mohan Gaydhane

  प्रत्युत्तर द्याहटवा
 5. Namaskar,
  Mala Sheli palan vyavasay karaycha aahe..Osmanabadi athva African Boar jatichya shelya kothe miltil yachi mahiti havi....

  sahakaryachi apeksha karto.

  Shankar Laxman Jethnale

  प्रत्युत्तर द्याहटवा
 6. बोअर आफ्रिकन जातीच्या शेळ्या किंवा नर(बोकड)यांची खरेदी कुठे खात्रीशीर करावी त्यांचा पत्ता व फोन नंबर क्रुपाकरून द्यावा माझा फोन नंबर 9029936507 व8433530407

  प्रत्युत्तर द्याहटवा