शनिवार, १४ एप्रिल, २०१२

एक जानेवारीपासून लेखी "सात-बारा' बंद!

मुंबई (प्रतिनिधी) ः 1 जानेवारी 2013 पासून राज्यभर ऑनलाइन आणि छापील सात-बारा उतारे देण्यात येणार असून, लेखी सात-बारा उतारे कालबाह्य होतील, अशी घोषणा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत शुक्रवारी (ता. 13) केली. ते म्हणाले,""राज्यातील जमिनींची मोजणी जीपीएस आणि सॅटेलाइटने पद्धतीने कालबद्ध कार्यक्रम राबवून वर्षभरात टायटल गॅरंटी कार्ड देणार आहे.'' महसूल आणि वन विभागाच्या अर्थसंकल्पीय अनुदान मागण्यांच्या उत्तरात ते बोलत होते. महसूलमंत्री थोरात म्हणाले, ""जीपीएस आणि सॅटेलाइट मोजणीचा पथदर्शी प्रकल्प मुळशी (जि. पुणे) येथे पार पडला आहे. प्रत्येक ठिकाणी 16 कॉंक्रिट पोलची उभारणी करून सॅटेलाइट इमेज व जीपीएसच्या माध्यमातून 6 सें.मी.देखील दोष राहणार नाही, इतकी अचूक जमीन मोजणी राज्यभर केली जाणार आहे. वर्षभरात राज्यभर योजना राबवून तत्काळ जमीन मालकांना टायटल गॅरंटी कार्ड देऊन हद्दी निश्‍चिती करणार आहे. येत्या 1 जानेवारीपासून लेखी सात-बारा देणार नाही. तलाठ्यांना दिलेले लॅपटॉप आणि प्रिंट स्वरूपात सात-बारा वितरित होईल.'' विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंनी उपस्थित केलेल्या 14 महसूल प्रकरणांची चौकशी करण्याची त्यांनी घोषणा केली. ते म्हणाले, ""जुन्या महसूल कायद्यात बदल करण्यासाठी कृष्णा भोगे समिती अहवाल प्राप्त झाला असून, भविष्यात कायद्यात दुरुस्ती करू. पैसेवारी निश्‍चित कशी करावी, यासंदर्भात अनेक समित्या नेमल्या. विरोधी पक्षनेत्यांसमवेत बसून याबाबत मार्ग काढू. पाच वर्षांतले उत्पन्न आणि सरासरी काढून पैसेवारी निश्‍चितीचा पुनर्विचार करावाच लागेल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा