मंगळवार, १० एप्रिल, २०१२

एअरटेलकडून कोलकतामध्ये '४ जी' सेवा सुरु

भारती एअरटेल कंपनीने आजपासून (मंगळवार) शहरात '४ जी' ब्रॉडबँड वायरलेस सेवा सुरु केली. भारतात '४ जी' सेवा सुरु करणारी एअरटेलही पहिली कंपनी आहे. येत्या काही काळात ही सेवा पुणे, चंदीगड आणि बंगळूरू शहरात सुरु करण्यात येणार असल्याचे, कंपनीने स्पष्ट केले आहे. '४ जी' सेवेमुळे इंटरनेटला स्पीड जास्त मिळणार असून, डाऊनलोडसाठी १०० मेगाबिट्स प्रति सेकंद एकढा स्पीड मिळेल. एअरटेलने मागील आठवड्यात '४ जी' सेवा सुरु करणार असल्याची घोषणा केली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा